धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक; सायबर क्राईमला दिली तक्रार

(Minister Dhnanjay Mundes Facbook Page Hack) फेसबुकने यामध्ये त्वतरीत लक्ष घालून मला अॅडमिनचा अॅक्सेस परत द्यावा. अशी विनंती देखील फेसबुकला करण्यात आल्याचे मुंडे यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.
Minister Dhnanjay Munde
Minister Dhnanjay MundeSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः राज्याचे सामाजिक न्याय व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक केल्याच्या संशयावरून त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. ट्विटच्या माध्यमातून मुंडे यांनी ही माहिती दिली. गेल्या काही काळात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकदा फेसबुक वापरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

सायबर क्राईमच्या वाढत्या गुन्ह्यांचा फटका आता राजकारण्यांना देखील बसू लागला आहे. राजकीय नेते आणि पुढारी मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाचा वापर करतात. फेसबुक पेजवर तर सर्वच पक्षाचे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी सक्रीय आहेत. आपल्या मतदारसंघातील कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिले जाते.

राज्यातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांचे फेसबुक पेज आहे, ज्यावर ते दिवसभरातल्या घडामोडी आणि अपडेट्स शेअर करत असतात. धनंजय मुंडे हे देखील यात आघाडीवर आहेत. पंरतु नुकतेच धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती आहे. ट्विटवरून त्यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे.

याप्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवल्याचे देखील मुंडे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, `माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे.

याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे`. याचबरोबर, मी धनंजय मुंडे या माझ्या अधिकृत फेसबुक पेजवरील अॅडमिन किंवा मॉडरेटरचा अॅक्सेस गमावला आहे. तरी फेसबुकने यामध्ये त्वतरीत लक्ष घालून मला अॅडमिनचा अॅक्सेस परत द्यावा. अशी विनंती देखील फेसबुकला करण्यात आल्याचे मुंडे यांनी ट्विटद्वारे कळवले आहे.

Minister Dhnanjay Munde
लातूर जिल्हा बॅंकेत भाजपचा राडा ; अर्ज बाद झाल्याने विचारला जाब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com