Dhangar Reservation: ओबीसी एल्गार सभेत फूट? धनगर समाजही लोकसभेच्या रिंगणात; रावसाहेब दानवेंच्या विरोधात...

Lok Sabha Election 2024: भाजपचे नेते, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात धनगर समाजाच्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा बोऱ्हाडे यांनी केली आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर होणार आहे. लोकसभेसाठी मराठा (Maratha Reservation) समाज प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार असल्याची घोषणा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. मराठा समाजाकडून काही ठिकाणी उमेदवारही जाहीर झाले आहेत. मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजही लोकसभेच्या रिंगणात उडी घेणार आहे. याबाबत धनगर समाजाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

धनगर समाजाच्या वतीने प्रत्येक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जालन्यात धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांनी ही घोषणा केली. धनगर समाजासाठी पाच जागा द्या, अशी मागणी त्यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. भाजपचे नेते, मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात धनगर समाजाच्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा बोऱ्हाडे यांनी केली आहे.

Lok Sabha Election 2024
Dilip Mohite: 'आढळरावांना मदत करा' असे सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेल! मोहितेंचा अजितदादांना इशारा

जालन्यातून धनगर समाजाच्या वतीने निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आल्याने एल्गार सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ याच्यासोबत असलेल्या धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळा निर्णय घेतल्याने भुजबळ यांचे नेतृत्व तयार झालेल्या ओबीसी एल्गार सभेत फूट पडली का? असा प्रश्न आता निमित्ताने निर्माण झाला आहे.

मागच्या अनेक वर्षांपासून धनगर समाज घटनात्मक आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी धनगर समाजाची दुहेरी फसवणूक केली आहे. आजच्या तीन कोटी धनगर समाज असताना मात्र त्यातील एकही धनगर संसदेत खासदार नाही. आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे दीपक बोऱ्हाडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com