Dilip Mohite: 'आढळरावांना मदत करा' असे सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेल! मोहितेंचा अजितदादांना इशारा

Shirur Lok Sabaha Election 2024: "राजकारण सोडेल पण आढळरावांसोबत एकत्र येणार नाही," असे दिलीप मोहिते पाटलांनी स्पष्ट केले.
Dilip Mohite,  Shivajirao Adhalrao
Dilip Mohite, Shivajirao AdhalraoSarkarnama
Published on
Updated on

Shirur: शिरुर लोकसभा मतदार संघावर (Shirur Lok Sabaha Election 2024 News) उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दावा केला आहे. उमेदवार कोण असेल हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने तेथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) यांचे नाव घेतले जात आहे. आढळरावांनी निवडणुकीची तयारीही सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन शिवाजीराव आढळराव हे शिरुर लोकसभा लढवतील, अशीही चर्चा आहे. त्याला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी विरोध केला आहे. त्यांच्या विरोधानंतर आज आढळराव पाटलांनी त्यांची भेट घेतली. पण आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला अन् उमेदवारीच्या विरोधावर ठाम असल्याचे मोहिते पाटलांनी सांगितले. "राजकारण सोडेल पण आढळरावांसोबत एकत्र येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

Dilip Mohite,  Shivajirao Adhalrao
Lok Sabha Elections 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, "आढळराव पाटील उमेदवार म्हणून भेटीला आले नाहीत. निवडणुकीसाठी मदत करा, असे ते म्हणाले नाहीत. त्यामुळे आमच्यातील मतभेद टोकाचे आहेत. पक्ष नेतृत्वाकडून विश्वासात घेतलं जात नाही. वीस वर्षांच्या संघर्षातून मी काय भोगलयं ते मलाच माहिती आहे. कष्ट करुन आमच्या वाट्याला दु:खच येणार असेल तर शांत राहणं चांगले," "आढळराव पाटलांना मदत करा, असे सांगण्यात आले तर मी राजकारण सोडून घरी बसेल," असे ते म्हणाले.

शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार कोणी का ? असेना केंद्रातील सत्ता आणि नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या हॅटट्रिकसाठी शिरुर जिंकण्याचा पक्का आणि मोठा निर्धार भाजपाने यावेळी केला आहे. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी शिरुरसह पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा क्लस्टर दौरा नुकताच केला आहे.

भाजपला ही जागा मिळाली, तर आपण तयारीत असल्याचा पुनरुच्चार भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी केला आहे.विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com