Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर उपोषण, तरुणांची प्रकृती खालावली

Dhangar Reservation hunger strike at water tank : महिनाभरापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन केले होते. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
Dhangar Reservation hunger strike at water tank
Dhangar Reservation hunger strike at water tank sarkarnama

Beed News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (एस.टी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील केकतसारणी येथील चार तरुण गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. उपोषणासाठी तरुणांनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची निवड केली आहे. सात दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने तरुणांनी प्रकृती खालावली आहे.

लोखंडी पट्टीच्या जुनाट पायऱ्या असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढणे देखील कसरतीचे आहे. आनंद धायगुडे, संदिपान धायगुडे, अंकुश मन्नाडे व महादेव नरवडे असे उपोषण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.

या तरुणांनी जलकुंभवर टाकलेल्या मंडपात उपोषण सुरू केले. आनंद धायगुडे आणि संदिपान धायगुडे या दोघांनी महिनाभरापूर्वी याच टाकीवर चढून धनगर समाजाला Dhangar Reservation आरक्षणासाठी 'शोले' स्टाईल आंदोलन केले होते. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

Dhangar Reservation hunger strike at water tank
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

आरक्षणाच्या संदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने आनंद धायगुडे, संदिपान धायगुडे, अंकुश मन्नाडे व महादेव नरवडे या संतप्त चार तरूणांनी एक जुलै रोजी पाण्याच्या टाकीवर चढून तर त्यांच्या समर्थनार्थ धनगर समाज बांधवांनी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले आहे. रविवारी सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट देऊन संवाद साधूनही आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच असल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे. ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

(Edited By Roshan More)

Dhangar Reservation hunger strike at water tank
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com