Chattrapati Sambhajinagr News : बिहारचे आरक्षण कोर्टाने रद्द केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिढ्या संपत आहेत, तरी आरक्षणाचा लढा काही केल्या समाप्त होत नाही. जातीय मतभेदाने राज्याचे मोठे नुकसान होत आहे. मराठी माणसामध्ये फूट पडण्याचा कट आखला जात आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वमान्य असा तोडगा काढा, त्याला माझा पाठिंबा असेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे, लक्ष्मण हाके यांच्या जीवाशी खेळ का करताय? असा खडा सवाल शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील महायुती सरकारला विचारला. (Uddhav Thackeray News)
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली.
मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव आणा. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजातील प्रतिष्ठितांना चर्चेसाठी बोलवा. जरांगेंनाही चर्चासाठी बोलवा. आरक्षणावर सरकारने सर्वमान्य निर्णय घेतला पाहिजे, त्याला माझा पाठिंबा असेल, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या शहराचे नामकरण मी केले आहे. त्यामुळे माझा या शहरावर अधिकार आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असला तरी येत्या काळात पुन्हा संभाजीनगर जिंकण्याच्या उद्देशाने मी मैदानात उतरलो असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकरकडून केवळ राज्यात योजनांची अतिवृष्टी केली जात आहे तर दुसरीकडे अमंलबजवणीचा दुष्काळ असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर केली.
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने जो विजय मिळवला आहे तो विजय हा चोरून मिळवळेला आहे. मी काढलेला बाळासाहेबांचा फोटो शिंदे गट वापरत आहे. धनुष्यबाण चिन्ह चोरले नसते तर त्यांना मिळालेली खरे मते कळली असती अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.