Marathwada Marathas Are Kunbi : मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच; धाराशिवच्या जिल्ह्याधिकाऱ्यांचा सरकारला शंभर पानी अहवाल सादर

Dharashiv Collectors Report To Govt : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रहपूर्वक मागवलेल्या या अहवालानंतर त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आम्हाला कुणबी-मराठा असे आरक्षण पूर्वीच्या निजाम प्रांतात होते. ते आरक्षण आम्हाला पुन्हा मिळावे, अशी मागणी केली आहे. त्याचे समर्थन करणाऱ्या नोंदी धाराशिव जिल्ह्यात आढळून आल्या आहेत. (Dharashiv collector's report to Government that Marathas of Marathwada are Kunbis)

दरम्यान, धाराशिव तालुक्यात गाव नमुना चौदामध्ये ८९ ठिकाणी, तर उमरगा तालुक्यात नऊ ठिकाणी मराठा हा कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. हे महसुली नोंदीचे पुरावे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी राज्य सरकारकडे सादर केले आहेत.

निजाम प्रांतात सामील असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये खासरा पाहणी आणि इतर महत्वाच्या महसुली कादगपत्रांवर मराठा उल्लेख आहे. इथे कुणबी उल्लेख आढळत नाही, असे यापूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना विदर्भ, खानदेशप्रमाणे कुणबीचा लाभ घेता येत नव्हता.

आता धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना जन्म-मृत्यू नोंदी, खासरा पाहणी आणि इतर महसुली कागदपत्रांवर मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आता आढळून आला आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आणि सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा हा कुणबी नोंद असल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रहपूर्वक मागवलेल्या या अहवालानंतर त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com