Tanaji Sawant : 'मी विकास केला नसेल तर जोडे घ्यायला तयार, आता कमिशनखोरांना...'

former MLA Rahul Mote : मंत्री तानाजी सावंत यांचे माजी आमदार राहुल मोटे यांना आव्हान
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

शितल वाघमारे

Dharashiv District News : '25 वर्षांच्या इतिहासात सत्ता घरी, नातेवाईक यांच्यात होती, तेव्हा 2 रुपयांचा विकास करता आला नाही, स्वतःची ठेकेदारी व गुत्तेदारी पुरती कामे केली. त्यांच्या गावासह इतर भागात पाणी पुरवले, स्वतःच्या गावात स्मशानभुमी करू शकला नाहीत. यापेक्षा विदारक चित्र दुसरे काय आहे?, मी विकास केला नसेल तर जोडे घ्यायला तयार आहे. हे मी चॅलेंज देतो.' असे म्हणत धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांना आव्हान दिले.

 भूम शहरात रविवारी १५० कोटींच्या आसपास विकासकामांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शहरातील नागरिकांच्या वतीने पालकमंत्री यांचा भव्य नागरी सत्कार पडला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, भूम न.प. चे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, माजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांच्यासह आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tanaji Sawant
Ashok Chavan News : 'राम देव्हाऱ्यात असावा...' अशोक चव्हाणांचा भाजपला टोला?

याप्रसंगी पुढे बोलताना सावंत म्हणाले की, 'लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या व अधिकार काय हे लक्षात घेतले पाहिजे. लग्नात, वाढदिवस, बारशाला हजर राहणे म्हणजे विकास नाही. लग्नात अगोदरच मुलीचे आई-वडील थकलेले असतात. त्यांचाच बुके सत्कार घेऊन त्यांना हजाराचे नुकसान करणे म्हणजे विकास नाही. याच नेत्याला लोकांनी निवडून द्यायचे, विकास नावाचा काही संबंध नाही. वचननामे व आश्वासन वाचा आपण काय केले, फक्त बोलून थांबणे वेगळे व काम करणे वेगळे.'

मिस्टर 10 परसेन्ट म्हणत बालवाडी पर्यंत शिक्षण झाले आहे का ? असा सवालही यावेळी बोलताना सावंत यांनी उपस्थित केला. विद्वानच्या चपल्या घेऊ मात्र मुर्खाचे मालक होणार नाही कारण तो त्याच्या रांगेत उभा करतो. मी त्याला लय बोलणार नाही, शिवसैनिक उत्तर देतील. 15 वर्ष तुम्ही सत्तेत होतात. अधिकारी, कंत्राटदार यांच्या चांगल्या ओळखी असतील त्यांना तुम्ही पिशवी घेऊन भेटत होता.

भुम परंडा वाशी भागात विकास हा शब्द डिकशनरीमध्ये नव्हता तो मी आणून विकास केला. सहा महिन्यात बाजार समिती सुसज्ज करू देतो, जिथे कमी तिथे आम्ही असं यावेळी मंत्री सावंत म्हणाले. कोणी हौसेने घर सोडून जात नाही, पश्चिम महाराष्ट्रच्या पुढे कणभर जास्त विकास करू असा संकल्प सावंत यांनी व्यक्त केला.

Tanaji Sawant
Manoj Jarange Morcha: : तान्हुले, लेकुरवाळ्या अन् वृद्धा थंडीत पाहत होत्या भूमिपुत्राची वाट !

मी जनतेचा सेवक आहे, सहीचा अधिकारी आहे त्यामुळे महावितरण कामे करण्यासाठी मी जिल्ह्याच्या निधीच्या 50 टक्के निधी आणला त्यामुळे कामे करुन घ्या. छपरी लोकप्रतिनिधी यांनी इतके दिवस दबावात काही मागणी काम केले नाही. हरितक्रांती, धवलक्रांती व शिवजल क्रांती या तीन क्रांतीचा वसा घेतला असून श्वास असेपर्यंत हे स्वप्न पूर्ण करणार असे मंत्री सावंत म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com