Marathwada Political News : धाराशिव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या तब्बल 268 कोटींच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी वाटप आणि कामे मंजूर करतांना गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले गेले. परंतु या कामांना स्थगिती देण्यामागचे खरे कारण समोर आले आहे.
एप्रिल 2024 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीचे फेब्रुवारीपर्यंत नियोजन करण्यात आले नव्हते. एका महिन्यात हे नियोजन घाईचे ठरले असते, त्यात अनियमितता आणि गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन 268 कोटींच्या कामांना तात्पुर्ती स्थगिती देण्यात आल्याचे समोर आले आहे. (Dharashiv) धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या परंतु कार्यारंभ आदेश न झालेल्या 268 कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील ही कामे असल्याचे बोलले जाते.
या कामांना स्थगिती दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये संतापाचे वातावरण होते. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला होता. कोणाच्या सांगण्यावरून या कामांना स्थगिती दिली, असा सवाल त्यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच अर्थमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची एक बैठक मुंबईत पार पडली.
यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या नियोजनास तात्पुरती स्थिगिती दिल्याच्या निर्णयावर चर्चा झाली. या निधीतील कोणत्या कामांमध्ये गैरप्रकार झाले आहेत का, नवा निधी कसा उपयोगात आणता येईल, यावर चर्चा झाली. या कामासंदर्भात जो काही निर्णय बैठकीत घेतला जाईल, तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येणार आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 26 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केले होते. तो आधार घेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या मात्र कार्यारंभ आदेश न झालेल्या सगळ्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु जुने कार्यारंभ आदेश न दिलेली कामे आता स्थगित होणार असली तरी तो निधी या वर्षी वापरता येईल, असे सांगितले जात आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.