

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवाराच्या घरासमोर रिव्हॉल्व्हर घेऊन पोलिस गणवेशातील फिरणारे दोन पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सुहास शिरसाठ आणि आणखी दोघांविरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
अहिल्यानगर शहराचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना सुरक्षा देणारे दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश काढला. नीलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
ही दोन्ही पोलिस अंमलदारांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोल्हेगाव परिसरात जाणे तसेच जवळील रिव्हॉल्व्हर चुकीच्या व हलगर्जी पध्दतीने हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण असताना, अशा प्रकारे शस्त्राचा गैरवापर किंवा निष्काळजीपणा केल्याचा आरोप गंभीर मानण्यात आला आहे.
तसंच, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रामदास वाणी यांनी तोफखाना पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यावरून सुहास शिरसाठ आणि अज्ञात दोघांविरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये एका टेम्पोजवळ दोन पोलिस कर्मचारी दिसत असून, एका पोलिसाच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर स्पष्टपणे दिसत आहे. तिथंच एका बाजूला खुर्चीवर बसलेला आणि एका घराच्या पायऱ्यांवर बसलेले दोन आणखी व्यक्ती दिसत आहेत. आमदार संग्राम जगताप यांची लोक, दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला.
हे सर्व चौघे, महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या घरासमोर असल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या व्हिडिओनंतर तक्रारदार रामदास वाणी यांचा व्हिडिओ देखील सुषमा अंधारे यांनी शेअर केला होता. यानंतर या प्रकरणाला आणखी वाचा फुटली.
या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके तसेच पदाधिकार्यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आल्याचा आरोप करून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच व्हिडिओतील इतरांवर कारवाईची मागणी केली.
या भेटीनंतर व व्हिडिओमधील दृश्यांच्या आधारे प्राथमिक चौकशी करून पोलिस अधीक्षक घार्गे यांनी तात्काळ कारवाईचा आदेश दिला. आमदार जगताप यांचे बॉडीगार्ड म्हणून नेमणूक असलेले आणि व्हिडिओमध्ये दिसून येणारे पोलिस कर्मचारी नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग या दोघांना निलंबित करण्यात आले. हे दोघेही पोलिस मुख्यालयात नेमणुकीला होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.