Dharashiv Kailas Patil News : फक्त.. पंचनामा व घोषणा नको, शेतकऱ्यांना पेरणीआधी मदत द्या!

महाराष्ट्राच्या विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या परिस्थितीवर उपाययोजना करण्यात सरकारला अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला अशी मागणी करण्यात आली आहे.
Dharashiv Kailas Shinde News
Dharashiv Kailas Shinde News Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Loksabha : जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची व दुष्काळी मदत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिव डॉ. सोनिया सेठी (Sonia Sethi) यांची भेट घेऊन केली. अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे झालेल्या जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या परिस्थितीवर उपाययोजना करण्यात सरकारला अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असल्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने या संदर्भात अद्याप निर्णय घेतला नसला तरी राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पाणीटंचाई, जनावरांचा चारा, अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.

Dharashiv Kailas Shinde News
Ashok Chavan News : अशोक चव्हाण यांची स्वप्नपूर्ती, जालना- नांदेड समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी आली समोर

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला आणि प्रशासनाला सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते का? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. सरकारने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन केवळ घोषणा न करता पेरणी आधी शेतकऱ्यांच्या हातात सरकारी मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मराठवाड्यातील आठ पैकी केवळ दोन पालकमंत्री उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यावर टीकेची जोड उठवली जात आहे. राज्याचे कृषिमंत्री या बैठकीला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) नेते शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळाच्या परिस्थिती संदर्भात हे सरकार किती गांभीर्याने काम करत आहे हे लक्षात येते, असा टोला त्यांनी लगावला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी काल मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिव सोनिया सेठ यांची भेट घेऊन धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परिस्थितीचे दाहकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. दरवेळी प्रमाणे सरकारने नुसत्या घोषणा न करता पेरणी आधी शेतकऱ्यांना मदतीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

Dharashiv Kailas Shinde News
Beed Crime News : ठेवीदारांना ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या सुरेश कुटेंवर आणखी एक गुन्हा दाखल होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com