Dharashiv News: 'धाराशिव' साठी 'दादागिरी' नंतर आता शिवसेनेने ठोकला शड्डू...

Dharashiv Lok Sabha Constituency: महायुतीत धाराशिव मतदारसंघ शिंदे गटालाच सुटणार असल्याचा अनंत जाधव यांचा विश्वास
Dharashiv Lok Sabha Constituency
Dharashiv Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत स्पर्धाच लागली आहे. हा मतदारसंघ आमचाच, असा दावा एकापोठापाठ दोन्ही पक्षांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने ही जागा आपल्यालाच सुटणार असे सांगत उमेदवारही जाहीर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघ गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2014 मध्ये प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले होते. 2019 मध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर निवडून आले. खासदार राजेनिंबाळकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत. ही जागा मूळ शिवसेनेची असल्याने महायुतीत ती जागा आपल्यालाच मिळणार, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी १२ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन ही जागा आपल्याच वाट्याला येणार असून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख अनंत जाधव यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषद घेऊन या जागेवर आपला हक्क सांगितला.

गेल्या 25 वर्षांपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आगामी निवडणुकीतही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्याचा निर्धार आम्ही केली आहे, असे जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, मोहन पणुरे, दत्ता साळुंके, गौतम लटके, ईश्वर शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, अमरराजे कदम, अजित लाकाळ आदी उपस्थित होते.

या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकही घेण्यात आली. शिवदूत बूध प्रमुख, सदस्य नोंदणीबाबत चर्चा करण्यात आली. घटक पक्षाने उमेदवार जाहीर केला असला तरी धाराशिव मतदारसंघ शिवसेनाच लढवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. राज्यातील ४८ पैकी महायुती ४५ जागा जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dharashiv Lok Sabha Constituency
Chhagan Bhujbal: बीडमध्ये दंगल घडविणारी माणसं जरांगेंचीच; भुजबळांचा हल्लाबोल

बिराजदार हेच उमेदवार असतील...

शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे धाराशिव मतदारसंघातून इच्छुक आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना हे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, अशी विश्वसनीय माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन प्रा. गायकवाड यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. शिंदे गटातून आणखी काहीजण इच्छुक असून योग्यवेळी तेही समोर येतील, असे सांगितले जात आहे. महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने निवडणुकीची तयारी जोमात सुरू केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, हे गृहीत धरून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बिराजदार हेच उमेदवार असतील, असे सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

Edited by: Mangesh Mahale

Dharashiv Lok Sabha Constituency
Pune News: पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, दिल्ली कनेक्शन; एकाला अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com