अय्यूब कादरी

मार्च २००० मध्ये पुणे सकाळमध्ये रुजू. त्यानंतर २०११ पर्यंत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), धाराशिव (उस्मानाबाद) येथे सकाळमध्ये कार्यरत. यादरम्यान उमरगा चौरस्ता (जि. धाराशिव) येथील मराठवाड्यातील पहिल्या डान्स बारमधील गैरप्रकारांबाबत मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर सरकारने बारचा परवाना रद्द केला. यासाठी डॅा. नानासाहेब परूळकेर पुरस्काराने सन्मान. २००४ आणि २००९ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन केले. २००५ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांच्या वार्तांकनाची जबाबदारी. एप्रिल २०११ मध्ये दैनिक दिव्य मराठीत धाराशिव ब्यूरो चीफ म्हणून रुजू. मार्च २०१२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत सोलापूर येथे दिव्य मराठीत वृत्तसंपादक (सेंट्रल डेस्क) म्हणून काम केले. तत्पूर्वी, १९९८ पासून छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक अजिंठा, मापदंड, लोकपत्र या दैनिकांत कार्यरत.
Connect :
अय्यूब कादरी
Read more
Sarkarnama
sarkarnama.esakal.com