Video Omraje Nimbalkar : 'फोन उचलल्यावर काय होतंय कळलं का..' ओमराजेंचा बॅनर फाडला !

Solapur Omraje Nimbalkar Shivsena Politics : बार्शी तालुक्यातील आगळगावात हा बॅनर लावण्यात आला होता. मात्र हा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama

Dharashiv News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बार्शी तालुक्यातील आगळगावात हा प्रकार घडला. 'फोन उचलल्यावर काय होतंय कळलं का..' असा आशय या बॅनरवर लिहिलेला होता.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना महाविकास आघाडी ठाकरे गट शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने अर्चना पाटील यांना भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती.

या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने ओमराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर ओमराजे यांनी फोन उचलल्यावर काय होतंय कळले का? अशी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगाविला होता.

Omraje Nimbalkar
Jarange Vs Bhujbal : "भुजबळांना थोड्या दिवसांत जनावरांचं इंजेक्शन अन् गोळ्या घ्याव्या लागणार"

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नागरिकांशी असलेला थेट जनसंपर्क ही ओमराजेंची जमेची बाजु होती. मात्र त्यांच्या याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांना ट्रोल करत केवळ फोन उचलले म्हणून खासदार होता येतं का, जॅक आणि टॉमी देणं हे खासदाराचं काम आहे का, खासदाराने ठोस काय काम केलं? असे प्रश्न उपस्थित केले होते. तर आपला प्रचार करताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये 60 हजारापेक्षा अधिक जणांचे नंबर सेव्ह असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

धाराशिवमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर खासदार निंबाळकर यांचे मतदारसंघातील विविध गावांमध्ये अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. सलग दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देणारे हे फ्लेक्स होते. या फ्लेक्सवर 'फोन उचलल्यावर काय होतंय कळलं का..'असा आशय असलेला मजकूर देखील लिहिण्यात आला होता. बार्शी तालुक्यातील आगळगावात हा बॅनर लावण्यात आला होता. मात्र हा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून बॅनर फाडणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोपट डमरे यांनी केली आहे.

Omraje Nimbalkar
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालावरुन आता धडा घ्या, पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरेंना टोला !

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे जनतेच्या मनातील खासदार आहेत. त्यामुळेच राज्याच सर्वाधिक मताधिक्यांनी ते विजयी झालेले आहेत. त्यांच्या कामामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. विरोधकांना काहीच सुचत नसल्याने अशा पद्धतीने बॅनर फाडून राग व्यक्त करण्याचे काम केले जात असल्याची टीका ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, जशात तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. खासदार निंबाळकर यांचे बॅनर फाडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी पांगारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याच आली असल्याचे डमरे यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com