Dharashiv Loksabha Constituency : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण केला. शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी औसा, उमरगा, तुळजापूर आणि भूम येथे माेठ्या सभा घेतल्या. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वेळी त्यांनी शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला, तर निष्ठावंत सैनिकांना ऊर्जा दिली. निष्ठावंत धाराशिवकरांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले होते.
धाराशिव लोकसभेचे सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर Omraje Nimbalkar हे शिवसेना पक्षफुटीनंतरही ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Latest News) यांनीही या दौऱ्यात धाराशिव लोकसभेचे उमेदवार हे ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव कळंब विधानसभेसाठी आमदार कैलास पाटील असल्याचेही स्पष्ट करून टाकले. उद्धव ठाकरे यांनी थेट उमेदवारीचे संकेत दिल्याने ओमराजे आणि आमदार कैलास पाटील आता शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला संपूर्ण जिल्ह्यात मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद निष्ठावंत शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारा ठरला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तर सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले आहे.Dharashiv Loksabha Constituency
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदरणीय पक्षप्रमुख आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांचा दोन दिवस धाराशिव आणि लातूर दौरा आज झाला. या झंझावती दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला विश्वासघात आणि त्याबद्दलची चीड जनतेच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसून येत होती. मतदानाच्या रूपाने आपला राग व्यक्त करायला जनता उत्सुक असल्याचा दावा ओमराजे यांनी माध्यमांशी बोलताना केला. राज्यातील सत्ता बदलली तेव्हा धाराशिवच्या आम्हा दोघांवरही अनेक प्रलोभने, आमिष, दबाव या सगळ्या गोष्टींचा वापर झाला. पण आम्ही गद्दारी केली नाही. आम्हाला साथ देऊन राजकारणात उभे करणाऱ्यांना धोका देण्याची "नमकहरामी" आम्ही कधीही करणार नाही. Dharashiv Loksabha Election 2024 Shivsena UBT Candidate
किती आमदार, खासदार गेले त्याची पर्वा नाही, शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक ठाकरेमध्येच असते. धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मी आणि आमदार कैलासदादा पाटील Kailas Patil यांनी उद्धवसाहेबांना लढेंगे भी और जितेंगे भी, असा विश्वास आम्ही मायबाप जनतेच्या भरवशावर दिला आहे. तुम्ही कितीही साम, दाम, दंड वापरा आम्ही तेव्हाही झुकलो नव्हतो व आजही झुकत नसतोच, असेही ओमराजे यांनी ठणकावून सांगितले.
उद्धवसाहेबांनी आम्हाला खांद्यावर हात ठेऊन जे लढायचे बळ दिले आहे, त्यामुळे आमची लढण्याची ताकद अनेकपटींनी वाढली आहे. आता या लढाईत तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला त्रास द्या, आम्ही आता एकच मन बनविले आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, अशा शब्दांत खासदार ओमराजे यांनी विरोधकांना आव्हान दिले.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.