Dharashiv Loksabha News : भाजप राणा पाटीलांनाच लोकसभेच्या आखाड्यात उतरवणार ?

Ranajagjeetsingh Patil : राणा पाटील यांना गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे.
Mla Ranajagjeetsingh Patil News
Mla Ranajagjeetsingh Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : भारतीय जनता पक्षाने आयोजीत केलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच वातावरण ढवळुन निघाले आहे. (Dharashiv Loksabha News) त्यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मोदी @9 उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा भाग म्हणुन संपुर्ण जिल्ह्यात भाजपचे नेते, कार्यकर्ते मोदी सरकारचे काम पोहचविणार आहेत. त्याची सूरुवात फडणवीस यांच्या सभेने झाली आहे.

Mla Ranajagjeetsingh Patil News
Abdul Sattar On Balasaheb Thackeray : सत्तारांचे बाळासाहेब प्रेम, सोयगांवमध्येही उभारणार स्मारक..

लोकसभा मतदारसंघाचा विचार करुन सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरपासूनच उमेदवार कोण ? यावर चर्चा सूरु झाली आहे. भाजपाचे राज्याचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची सभा व नियोजीत कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पडले. सभेला गर्दी खेचण्यातही (Bjp)भाजपच्या नेत्यांना यश आले. यामध्ये राणाजगजितसिंह पाटील (Mla Ranajagjeetsingh Patil) यांचा सभेवर प्रभाव दिसून आला, त्यांना पुढील काळात भाजपचे स्थानिक नेतृत्व म्हणुन पुढे आणले जाईल, अशी शक्यता आहे.

शिवाय लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता त्यांच्याकडेच उमेदवार म्हणुन पाहिले जात आहे. त्यांच्याव्यतिरिक्त मतदारसंघात प्रभावी नेता सध्यस्थितीला तरी भाजपकडे दिसत नाही. (Osmanabad) संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नाव यादीत असले तरी त्यांचा लातुरमध्ये प्रभाव पडेल, मात्र जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात त्यांना मतदान करताना विचार केला जावू शकतो. त्यामुळे सर्वसमावेशक नावाचा विचार करुनच भाजप येथे उमेदवार देण्याची शक्यता अधिक आहे.

राणा पाटील यांना गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. फडणवीस यांच्या सभेनंतर त्यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. बार्शी, लातुर जिल्ह्यातील काही भाग मतदारसंघात असला तरी तिथे भाजपचा प्रभाव आहे. मतदारसंघ अंकगणिताच्या हिशोबाने सोयीचा दिसत आहे. सहा विधानसभापैकी पाच ठिकाणी भाजप व शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.

कळंब धाराशिव येथील आमदार ठाकरे गटाचे असले तरी त्या भागात राणा पाटील यांचा चांगला प्रभाव आहे. तिथेही त्याना फारशी अडचण येणार नसल्याचे चित्र आहे. राणा पाटील यांची स्वतःची लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा आहे की नाही? हे स्पष्ट नाही. परंतु पक्षाने आदेश दिला तर ते मैदानात उतरतील एवढे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com