Abdul Sattar On Balasaheb Thackeray : सत्तारांचे बाळासाहेब प्रेम, सोयगांवमध्येही उभारणार स्मारक..

Marathwada : आगामी वर्षी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांच्या स्मारकास सोयगावात अभिवादन करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू.
Abdul Sattar On Balasaheb Thackeray News
Abdul Sattar On Balasaheb Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : चार वर्षांपुर्वी शिवसेनेत दाखल झालेले आणि आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ भगवा झाला आहे. (Abdul Sattar On Balasaheb Thackeray) सत्तारांच्या अंगात शिवसेना इतकी भिनली आहे की, त्यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी सिल्लोड प्रमाणेच सोयगावमध्ये देखील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली.

Abdul Sattar On Balasaheb Thackeray News
Parli Sugar Factory News : सूर जुळले, परळी कारखान्याच्या अध्यक्षपदी पकंजा, तर उपाध्यक्ष पद धनंजय मुंडे गटाला..

सोयगाव नगरपरिषदेने स्मारकासाठी तात्काळ जागा शोधण्याचे आदेश देखील (Abdul Sattar) सत्तारांनी संबंधित विभागाला दिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करता करता सत्तारांना ऐनवेळी (Shivsena) शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घ्यावे लागले होते. त्यामुळे संपर्क कार्यालयवरचे झेंडे, बॅनर बदल त्यांनी संपुर्ण तालुका भगवामय केला होता.

आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या सत्तारांनी अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेच्या बंडात उडी घेतली. (Balasaheb Thackeray) या जोखीमेचे फळ सत्तारांना कॅबिनेटपदी बढतीच्या रुपात मिळाले. अगदी कृषी सारखे महत्वाचे मंत्रीपद त्यांना मिळाले. सत्तार ज्या पक्षात जातील, त्या पक्षाला आपलेसे करून घेतात हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे.

काॅंग्रेसनंतर शिवसेनेत आलेल्या सत्तारांनी इतक्या लवकर शिवसेनेची संस्कृती स्वीकारली की ते काॅंग्रेसमध्ये होते याचा विसरच अनेकांना पडला. ज्या सिल्लोड-सोयगांव तालुक्यात शिवसेनेचे अस्तित्व शून्य होते, तोच मतदारसंघ आता सत्तारांनी भगवा करून टाकला आहे. या शिवसेना प्रेमातूनच त्यांनी आज वर्धापनदिनाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. सिल्लोड प्रमाणेच सोयगाव येथे देखील लवकरच बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

स्मारकासाठी जागेचा शोध घेण्यासह तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देखील सत्तार यांनी दिले आहेत. येत्या वर्षभरात सदरील स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तसेच आगामी वर्षी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांच्या स्मारकास सोयगावात अभिवादन करून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करू, असे आश्वासन देखील सत्तार यांनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास तालुकाप्रमुख प्रभाकर काळे यांनी देखील व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com