Dharashiv News: धाराशिवला महायुती सरकारचा आणखी एक मदतीचा हात; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा

Mahayuti Government : तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यापाठोपाठ आता तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Dharashiv News .jpg
Dharashiv News .jpgSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्रातील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी घेतला. आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेत हे महाविद्यालय शासकीय म्हणून ओळखले जाणार आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्हा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शासकीय शुल्कात अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आहे, अशी माहिती तुळजापूरचे भाजपचे आमदार, 'मित्र'चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinh Patil) यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील हे पहिलेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असेल.

वसंतदादा पाटील हे दुसऱ्यांदा 1983 मध्ये मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. व्यावसायिक अभ्याक्रमांचे खासगीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्याअंतर्गत तुळजापुरात 1983 मध्ये तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले होते.

तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे हे महाविद्यालय चालवले जात होते. या भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा मोठा फायदा झाला. आता हे महाविद्यालय शासकीय होत असल्यामुळे कमी खर्चात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

यासंदर्भात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत बैठक बोलावली होती. तीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार पाटील हेही उपस्थित होते. आपल्या मागणीला चंद्रकांतदादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासकीय करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांची शासकीय शुल्कामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची सोय होऊन या भागाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Dharashiv News .jpg
Neelam Gorhe : अलाहाबाद हायकोर्टाचा बलात्कार प्रकरणातला 'तो' निर्णय; संतप्त नीलम गोऱ्हेंची सर्वोच्च न्यायालयाकडे 'ही' मोठी मागणी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे, यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री, उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळाले आहे. या निर्णयामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या शुल्कात मोठी बचत होणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठीही मदत होणार आहे.

तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यासाठी पुण्यातील एका शिक्षण संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या भागातील विद्यार्थ्यांना आता 70 हजार रुपयांऐवजी 25 ते 30 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यासाठी 70% जागा आरक्षित राहणार असल्याने गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com