Marathwada : माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे महिनाभरानंतर बीड जिल्ह्यात परतले आहेत. अपघात झाल्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्याने ते मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत होते. तब्यत ठणठणीत झाल्यानंतर आज ते बीड जिल्ह्यात परतले. त्यांनी पहिल्यांदा श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर जाऊन संत वामनभाऊ यांचे दर्शन घेतले.
यावेळी गडाचे महंत ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले. गहिनीनाथ गडावर प्रेम व सन्मान व्यक्त केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभारही व्यक्त केले. (Parli) परळीत दाखल होताच त्यांनी आपले वडिल स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. (Beed) त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या मातोश्रींनी औक्षण करून मुंडे यांना आशीर्वाद दिले.
अपघाताच्या या घटनेतून बाहेर पडून जनसेवेत पुन्हा रुजू होताना अण्णा व बाईंचे (आई) आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचे असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. ४ जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास परळी येथील कार्यक्रम आटोपून घरी परतत असतांना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता.
मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला होता. परळीत प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
या अपघात त्यांच्या बरगड्या फॅक्चर झाल्या होत्या, तसेच डोक्यालाही मार लागला होता. १६ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना १९ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र किमान तीन आठवडे विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितल्यामुळे ते मुंबईतच मुक्कामी होते. आज ते परळीत परतले असून त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी जय्यत तयारी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.