Ambadas Danve : महाविकास आघाडीवर टीका करण्याआधी फडणवीसांनी याची उत्तरे द्यावीत..

Marathwada : अडीच वर्षात दोन वर्षे ही कोरोनाची होती, याचा विसर त्यांना पडला. महाराष्ट्रात प्रेतं तरंगली नाहीत, हे सांगायला मात्र ते विसरले.
Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Ambadas Danve-Dcm Fadanvis News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : नाशिक येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारच्या काळात राज्य अधोगतीला गेले, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Sandipan Bhumre : तुम्ही कारखान्यात दारू तयार करत नाही का ? पवारांना सवाल..

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Shivsena) यांनी ट्विटच्या माध्यमातून फडणवीसांना काही घटना, घडामोडींची आठवण करून देत उत्तरे मागितली आहेत. (Mahavikas Aghadi)दानवे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारवर टीका केली.

त्या अडीच वर्षात दोन वर्षे ही कोरोनाची होती, याचा विसर त्यांना पडला. महाराष्ट्रात प्रेतं तरंगली नाहीत, हे सांगायला मात्र ते विसरले. उत्पन्न थांबलेले असताना मविआने समृद्धीच्या कामात अडथळा नको म्हणून ७ हजार कोटी रुपये दिले होते.

योजनांचा पाढा वाचताना मात्र उज्वला योजनेतून गॅस घेणारे किती ग्राहक आज सिलिंडर न घेता पुन्हा चुलीकडे वळले आहेत, याचाही लेखाजोखा एकदा घ्या ! मुद्रा योजनेत वाटलेले जनतेचे पैसे किती प्रमाणात बँकेत परतफेडीच्या रूपाने आले, हे पण तपासा, असा टोला दानवे यांनी लगावला.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजुर झाल्या त्याबद्दलही दानवे यांनी भाजपला टोला लगावला. राज्यपाल महोदयांचा राजीनामा देण्यास-मंजूर करण्यास विलंबच झाला. महाराष्ट्राची त्यांनी केलेली उपेक्षा ही न विसरता येणारी आहे. येणाऱ्या राज्यपालांनी संविधानाचा आदर राखून काम केले तर महाराष्ट्रात वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com