Aurangabad : दानवे म्हणाले, आमच्या पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणारा नाही..

आता दानवे यांनी हे विधान भुमरे यांचे कौतुक करण्यासाठी केले होते? की मग त्यांना चिमटा काढला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ( Minister Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve-Sandipan Bhumre News Aurangabad
Minister Raosaheb Danve-Sandipan Bhumre News AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाषण म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. ग्रामीण शैली आणि टोलेबाजी हे दानवेंच्या भाषणाचे वैशिष्ट. पण पैठणमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेत दानवेंना (Raosaheb Danve) आज फारशी संधी मिळाली नाही. शिंदे यांना उशीर होऊ लागल्याने दानवे यांचे एकमेव भाषण झाले, पण वेळेअभावी त्यांनी ते आटोपते घेतले. त्यामुळे दानेव काय बोलतात याकडे कान टवकारून बसलेल्यांची निराशा झाली.

पण आपल्या छोटेखानी भाषणात दानवेंनी मंत्री संदीपान भुमरे यांचा उल्लेख चक्क पैठणचा बोक्या असा केला आणि उपस्थितांनी त्याला खळखळून हसत दाद दिली. (Paithan) राज्यातील सत्तातंतर, शिंदे व त्यांच्यासोबत पन्नास आमदारांनी केलेले बंड याचा उल्लेख करतांना दानवे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटातील आमदारांवर `खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके, पन्नास खोके` या विरोधकांच्या घोषणेचा संदर्भ देत एक विधान केले. (Marathwada)

दानवे म्हणाले, विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर खोके घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला जातो. पण भुमरे यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय पैठण मतदारसंघातील लोकांना आवडलेला आहे. आजच्या सभेला जमलेली गर्दी ही त्याचीच पावती आहे. आपला पैठणचा बोक्या खोक्यांवर विकला जाणार नाही, असा विश्वास येथील जनतेला असल्याचा उल्लेख दानवेंनी केला आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

Minister Raosaheb Danve-Sandipan Bhumre News Aurangabad
Aurangabad : भुमरे कानात येऊन सांगत होते, पण मुख्यमंत्र्यांनी कोणतीच घोषणा केली नाही..

आता दानवे यांनी हे विधान भुमरे यांचे कौतुक करण्यासाठी केले होते? की मग त्यांना चिमटा काढला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यातील जनतेने भुमरे यांना आणि युतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिले होते. पण उद्धव ठाकरे यांनी युतीचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या सभेला जमलेली गर्दी त्यांनी घेतलाला निर्णय किती योग्य होता हे दर्शवते, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com