Ranjeet Kasle News : 'झुकेगा नही साला' म्हणणाऱ्या रणजीत कासलेला गुजरात पोलीसांनी गुडघे टेकायला लावले!

Beed Crime- Ranjeet Kasle Arrest : कासले काही दिवसापूर्वी सुरतला गेला होता. सुरत या ठिकाणी तपासाच्या नावाखाली दोन मोबाईल आणि दोन लाखापेक्षा आधीची रक्कम लुटल्याचे उघड झाले आहे.
Ranjeet Kasle Arrest by Gujrat Police News
Ranjeet Kasle Arrest by Gujrat Police NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेवर मोबाईल चोरी आणि दोन लाख रुपये लुटल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

  2. गुजरात पोलिसांनी लातूरमधून रणजीत कासले याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

  3. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ माजली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाला वेग दिला आहे.

Marathwada Crime News : राजकीय नेते, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याचा नवा कारनामा समोर आला आहे. स्वतःला 'बाॅस' म्हणत इतर राज्यातून व्हिडिओ व्हायरल करत खळबळजनक दावे करणारा रजणजीत दसले आता चक्क गुजरात पोलीसांच्या कचाट्यात सापडला आहे. मोबाईल चोरी आणि दोन लाख रुपये लुटल्या प्रकरणी दोन दिवसापुर्वी गुजरात पोलीसांनी कासलेच्या मुसक्या आवळल्या.

लातूरमधून अटक करत त्याला गुजरातमध्ये नेल्यानंतर पोलीसांनी त्यांच्या कारनाम्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये रणजीत कासले दोन ते तीन तरुणांना धमकावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेत असल्याचे दिसते. एवढेच नाही तर गुजरात पोलीसांनी कासले याने दोन लाख रुपये लुटल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हाही दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, अटकेनंतर आपल्याकडून चूक झाली, पुन्हा असे घडणार नाही, असे म्हणत कान पकडून माफी मागतानाच रणजीत कासले याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कासले काही दिवसापूर्वी सुरतला गेला होता. सुरत या ठिकाणी तपासाच्या नावाखाली दोन मोबाईल आणि दोन लाखापेक्षा आधीची रक्कम लुटल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सुरत पोलिसांना मिळाला. तक्रार आल्यानंतर त्यांनी तपास करत रणजीत कासले याला लातूर येथून अटक केली होती. तपासाच्या नावाखाली दोघांना धाकदपटशहा करत त्यांची मोबाईल हिसकावून घेऊन जात असलेल्या रणजीत कासले व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर सुरत पोलिसांनी गुन्हा कबूल करत माफी मागणाऱ्या रणजीत कासलेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Ranjeet Kasle Arrest by Gujrat Police News
Ranjit Kasle EVM Claim : बडतर्फ रणजीत कासले कोठे होता? 10 लाखाच्या दाव्यावर निवडणूक आयोगाचा 'मोठा' खुलासा

रणजीत कासले याला 20 ऑक्टोंबरला मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले याच्याबाबत माहिती मिळाली. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय गुजरात पोलिसांना असल्याने त्यांनी दोन दिवसाआधी लातूरमधून शहरात रणजीत कासले याला अटक केली.

Ranjeet Kasle Arrest by Gujrat Police News
Beed News : गोपीचंद पडळकरांचा मोर्चा होताच जेलरला दणका ; पेट्रस गायकवाड यांची थेट नागपूरला बदली!

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रणजीत कासले याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कागदपत्राची पूर्तता करून सहा जणांच्या पथकाने कासले यास गुजरात येथील सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनला नेले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर वाल्मीक कराड याबाबतच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रणजीत कासले यांनी व्हायरल केले होते. या शिवाय मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांवरही कासले याने गंभीर आरोप केले होते.

कासलेवर आठवा गुन्हा थेट गुजरातमध्ये

दरम्यान, रणजीत कासले याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात सात गुन्हे दाखल आहेत. आता गुजरामध्ये त्याच्यावर आठवा गुन्हा दाखल झाला आहे. रणजीत कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत हेती. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्याच्यावर आहे.

आरोपींकडून पैशांची देवाण-घेवाण केली असा आरोप,विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा कासले याने केला होता. तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले याने पोस्ट केले होते. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असल्याचा दावा करत कासलेने खळबळ उडवून दिली होती.

FAQs

1. रणजीत कासले कोण आहेत?
रणजीत कासले हे महाराष्ट्रातील बीडचे एक बडतर्फ पोलीस अधिकारी असून त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत.

2. त्यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे?
त्यांच्यावर मोबाईल चोरी आणि दोन लाख रुपयांच्या लुटीचा आरोप असून गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.

3. अटक कुठे करण्यात आली?
गुजरात पोलिसांनी रणजीत कासले यांना लातूरमधून अटक केली आहे.

4. प्रकरणाची चौकशी कोण करत आहे?
गुजरात पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेतले जात आहे.

5. या घटनेचा पोलिस विभागावर काय परिणाम झाला आहे?
या घटनेमुळे पोलिस विभागात धक्का बसला असून बडतर्फ अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com