Ranjit Kasle EVM Claim : बडतर्फ रणजीत कासले कोठे होता? 10 लाखाच्या दाव्यावर निवडणूक आयोगाचा 'मोठा' खुलासा

Election Commission clarification EVM claims dismissed Beed police officer Ranjit Kasle : बीड पोलिस दलातील बडतर्फ रणजीत कासले याने धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमजवळ फिरकू नये म्हणून केलेल्या दाव्यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे.
Ranjit Kasle EVM Claim
Ranjit Kasle EVM ClaimSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये यासाठी आपल्याला 10 लाख रुपये दिल्याचा दावा निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी केला होता.

यामुळे निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते . मात्र आता हा दावा निवडणूक आयोगाने सपशेल फेटाळला. याबाबतचा खुलासा महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

निलंबित पोलिस (Police) अधिकारी रणजीत कासले यांनी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे दावे करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. सुरुवातीला यांनी आपल्याला वाल्मिक कराड याची सुपारी देऊ केली होती, असा दावा केला होता. यामध्ये कासले यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतलं होतं. त्यानंतर कासले पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर आणखी काही खळबळजनक दावे केले. त्यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान ईव्हीएमच्या जवळ फिरकू नये, यासाठी आपल्याला धनंजय मुंडे यांनी 10 लाख रुपये देण्याचा दावा केला होता. या सर्व गोष्टींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Ranjit Kasle EVM Claim
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी कोणामुळे? कोण कोणाला दत्तक घेणार; गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांची 'मोठी' कबुली

त्यामुळे आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (Election Commission) पुढे येत याबाबत खुलासा करत स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्ध पत्र जाहीर केले आहे. या प्रसिध्दी पत्रकात महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कासले दावे फेटाळले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांना कोणत्याही प्रकारची निवडणूक ड्युटी लावण्यात आली नव्हती. निवडणूक आयोगाने सांगितला आहे.

Ranjit Kasle EVM Claim
Shiv Chhatrapati Sports Award : आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची; पठ्ठ्यानं जिद्दीनं 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा'वर नाव कोरलं

विधानसभा निवडणुकीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती. केंद्रीय दल, राज्य राखीव पोलिस आणि जिल्हा पोलिसांसह मजबूत त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेने स्ट्राँग रूमच्या सुरक्षात दैनात होती. निवडणूक प्रक्रियेवरती 24 तास 'सीसीटीव्ही'च्या निरीक्षणात होती तसेच अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी तैनात होते.

हे दावे/आरोप बिनबुडाचे, निराधार, दिशाभूल करणारे आणि निवडणूक प्रक्रियेवर अवास्तव शंका निर्माण करण्याच्या उद्देशाने आहेत, बीड जिल्हाधिकारी आणि एसपी अहवालांनी पुष्टी केली आहे. निवडणूक निष्पक्ष, शांततेत आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने पार पडली, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com