पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

तेव्हा पंडीतअण्णा माझ्याशी महिनाभर बोलत नव्हते.
PanditAnna Munde-dhananjay munde-Gopinath Munde
PanditAnna Munde-dhananjay munde-Gopinath MundeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माझ्यावर माझे वडील पंडीतअण्णांपेक्षा माझे काका गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचाच जादा प्रभाव आहे. मला या दोघांच्या कार्यपद्धतीने काम करावं लागतं. या दोघांची २००२ मधील ही आठवण आहे. मी कोणत्या गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, यावरून या दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झाले होते. शेवटी दोघांनी ठरवलं की निवडणूक कोठून लढवायची, हे धनंजयला ठरवू द्यावं. मला जेव्हा विचारलं तेव्हा मी मुंडेसाहेबांनी ज्या गटातून निवडणूक लढवली होती, त्याच गटातून लढणार असल्याचे सांगितले (विशेष म्हणजे मुंडेसाहेबांचंही मत तेच होते) तेव्हा पंडीतअण्णा माझ्याशी महिनाभर बोलत नव्हते, अशी आठवण राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितली. (Dispute between PanditAnna and Gopinath Munde over my constituency : Dhananjay Munde)

धनंजय मुंडे यांनी एका मुलाखतीत आपल्या जीवनातील अनेक राजकीय गोष्टींचा उलगडला केला. त्यात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घडलेला किस्साही सांगितला. जिल्हा परिषदेच्या २००२ मधील निवडणुकीच्या वेळी मुंडे कुटुंबात घडलेली घटना खुद्द धनंजय मुंडे यांनी कथन केली आहे.

PanditAnna Munde-dhananjay munde-Gopinath Munde
पहाटेच्या शपथविधीतील तो प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल

ते म्हणाले की, माझ्यावर पंडीतअण्णांपेक्षा मुंडेसाहेबांच प्रभाव अधिक आहे. या दोघांची २००२ मधील ही आठवण आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली होती. त्यावेळी पंडीतअण्णांऐवजी मी निवडणूक लढवावी, असे ठरले होते. त्यानंतर घरात चर्चा सुरू होती की, धनंजयला कुठून उभा करायचे. त्यावेळी माझ्या वडिलांचे म्हणजे पंडितअण्णांचे मत असे होते की, आमचे हामेपीच म्हणजे गाडेपिंपळगाव या गटातून मला उभं करायचं. पण, गोपीनाथ मुंडे यांचं म्हणणं होते की पट्टीवडगावमधून धनंजयला उभं करायचे. त्याच गटातून मुंडे साहेब स्वतः १९७८ मध्ये निवडून आले होते.

PanditAnna Munde-dhananjay munde-Gopinath Munde
नेत्यांनी निवडणुकीत राजकारण केले; पण, मी बँकेवर पुन्हा येणार...

मी कोणत्या गटातून निवडणूक लढवायची, यावरून त्या दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले की ‘कुठून उभं राहायचं, हे धनंजयला ठरवू द्यावं. त्यानंतर अण्णांनी मला विचारले की तुला कुठून उभं राहायचं आहे. मी सांगितलं की, मला पट्टीवडगावमधून निवडणूक लढवायची आहे. त्यावेळी अण्णा माझ्याशी एक महिनाभर बोलत नव्हते. त्यांना असं वाटत होतं धनंजय पट्टीवडगावमधून पडेल, त्यामुळे त्यांनीसुद्धा शिरसाळा भागातून निवडणूक लढवली होती.

माधुरी दीक्षित आवडती अभिनेत्री...

मला सिनेमाची आवड होती. शाळा बुडवून ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पहायची हौस होती. थिएटरमधील संपूर्ण रांग बुक करून आम्ही सर्व मित्र चित्रपट पहायचो. एकदा माझ्या सर्वात छोट्या काकांनी खांद्यावर बसवून मला थिएटरपर्यंत नेले होते. त्या ठिकाणी खुर्च्या नव्हत्या, त्यावेळी संपूर्ण चित्रपट मी काकांच्या खांद्यावर बसून बघितला होता. माधुरी दीक्षित ही माझी आवडती अभिनेत्री हेाती. हे आमच्या घरीही माहिती होते, त्यामुळे १९९५ मध्ये युतीचे सरकार आल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माधुरी दीक्षितशी माझी ओळख करून दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com