Dharashiv BJP Politics : जिल्हाध्यक्षांची निवड होऊन तीन महिने झाले, पण कार्यकारिणी ठरेना...

BJP News : इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या, पण अद्याप घोषणा झालेली नाही.
BJP Latest News
BJP Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जाहीर होत नसल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Dharashiv News) नवीन जिल्हाध्यक्ष यांच्यापुढे कोणत्या गटाच्या नावांना पसंती द्यावी, याचा मोठा पेच असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांतील कार्यकारिणी निवडली गेली. मात्र, इथे अजून काहीच हालचाल दिसत नाहीत.

BJP Latest News
BJP Parbhani Politics : बिधुरी यांच्या वक्तव्यावर बोलणाऱ्या फौजिया खान दानिश, स्टॅलिनच्या विधानावर गप्प का ?

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया कधी होणार याकडे कार्यकर्ते डोळे लावून आहेत. (BJP) आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस व आठ तालुकाध्यक्ष अशा संघटनात्मक महत्त्वाच्या पदांची निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्यापुढे मोठे धर्मसंकट उभे आहे.

पक्षातील नव्या आणि जुन्या निष्ठावंतांची सांगड घालून समन्वय साधताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार असे दिसते. (Marathwada) पक्षात स्वत:चा प्रभाव दाखविण्यासाठी सर्वच गटाकडून शक्ती दाखविली जात आहे. (Maharashtra) सरचिटणीस करताना एक महिला व एक अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्तीला संधी देण्याचे बंधन यंदापासून आहे. त्यामुळे राहिलेल्या दोनपैकी कोणत्या गटाला ही संधी द्यायची? हा मोठा प्रश्न आहे.

जिल्हाध्यक्ष यांची निवड होऊन तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. तरीही तालुकाध्यक्षांच्या निवडी झालेल्या नाहीत. इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या, पण अद्याप घोषणा झालेली नाही. प्रदेश कार्यकारिणी सदस्य निवडीवेळी जुना व नवीन असा समन्वय साधला गेला आहे, पण आता ते जमेल का? की एखाद्या गटावर अन्याय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याच्या स्थितीत अध्यक्ष हे जुन्या गटाचे प्रतिनिधित्व करत असल्याने जुन्या भाजप कार्यकर्त्यांना संधीची अधिक अपेक्षा आहे.

आतापर्यंत तरी जिल्हाध्यक्षांनी आपला सवतासुभा ठेवल्याने निवडीबाबत कोणालाच अंदाज येत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावेळी जुना नवा वाद चांगलाच पेटला होता. त्यामुळे तसा अनुभव पुन्हा यायला नको, याची काळजी जिल्हाध्यक्ष घेत असल्याची चर्चा आहे. नवीन भाजप नेत्यांनी जिल्हाध्यक्षांना हाताशी धरून जुन्या लोकांना शह दिल्याचीही चर्चा खासगीत होते. त्यामुळे प्रदेशाने पुन्हा जुन्याच भाजप कार्यकर्त्यास जिल्हाध्यक्ष पद देऊन योग्य तो संदेश दिला आहे. या संदेशातून जिल्हाध्यक्ष काय बोध घेणार? हे पाहवे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com