Silver Oak Attack : पवारांना पितृस्थानी मानता अन्‌ वकिली फडणवीसांची करता..? हे दुर्दैवी!

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका
Prashant Jagtap-Chitra Wagh
Prashant Jagtap-Chitra WaghSarkarnama

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या निवास स्थानी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) हल्ला केला. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेचा निषेधच केला आहे. मात्र, भाजपच्या काही नेत्यांनी निषेध करताना राष्ट्रवादीकडेही बोट दाखवले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्याला पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (NCP's Prashant Jagtap criticizes BJP's Chitra Wagh)

Prashant Jagtap-Chitra Wagh
‘मातोश्री’वर हल्ला करायचा होता; म्हणजे काय किंमत मोजावी लागली असती, ते कळले असते!

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ST कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक...आतापर्यंत आंदोलनात १२५ कर्मचाऱ्यांनी आपले जीव गमावले.. राष्ट्रवादीकडनं मात्र हा मोर्चा भाजप व देवेंद्रजींनी घडवून आणल्याचा चुकीचा कांगावा केला जातोय...भाजपचं देवेंद्रजींचं नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण होत नाही, का हा प्रश्न पडतोय,असा सवाल उपस्थित केला होता. त्याला पुण्याचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उत्तर देताना वाघ यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या विधानाची आठवण करून दिली आहे.

प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ताई, आपणच आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना पितृस्थानी मानता, असे आपण काही दिवसांपूर्वी जाहीरपणे कबूल केले होते. आज त्यांच्या घरावर हल्ला होऊनसुद्धा तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची वकिली करावी लागते, हे खरोखर दुर्दैवी आहे, असा टोला लगावला आहे.

दरम्यान, पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज (ता. ९ एप्रिल) न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर १०९ आंदोलक कर्मचाऱ्यांचाही अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला असून त्यांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com