Ambadas Danve News : 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती', पराभवाने खचू नका!

Review of the constituency by Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुमार कामगिरीला जबाबदार कोण? याची चर्चा सुरु असतानाच दानवे यांनी पराभूत मतदार संघाचा दौरा करत आढावा घेतला.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पराभव झाला. एकनिष्ठ उदयसिंह राजपूत यांच्या कन्नड मतदार संघातही पक्षाला जागा राखता आली नाही. 2019 मध्ये जिल्ह्यातील सर्व मतदार संघात शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीने सर्व नऊ जागा जिंकल्या.

पण यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाटी मात्र कोरीच राहिली. निवडणुक निकालाच्या आठवडाभरानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जिल्ह्यातील मतदार संघात जाऊन आढावा घेतला. पराभवाने खचून जाऊ नका, येणाऱ्या काळात पुन्हा यश संपादन करू, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संघटना खंबीरपणे तुमच्या पाठीशी असून अहोरात्र काम करण्याची आमची तयारी आहे, शिवसैनिक म्हणून तुम्हीही संघटनेला वेळ द्या,असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.

Ambadas Danve News
Ambadas Danve News : लक्षात ठेवा, भाजप एकनाथ शिंदेंना रडवणार! अंबादास दानवे पुन्हा बोलले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुमार कामगिरीला जबाबदार कोण? याची चर्चा सुरु असतानाच दानवे यांनी पराभूत मतदार संघाचा दौरा करत आढावा घेतला. (Shivsena) शहरातील मध्य, पश्चिम आणि ग्रामीण मधील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर मतदार संघात दानवे यांनी बैठका घेत शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Ambadas Danve News
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून केंद्रीय मंत्र्यावर आरोप; निवडणुकीत काम न केल्याचा ठपका

'समय बहरा है,उसने किसी की नहीं सुनी, परंतु वह अंधा नहीं,उसने सबको देखा है',असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, अशा शायराना अंदाजात त्यांनी शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्याचा प्रयत्न केला. क्या कमी रह गई, देखो और सुधार करो। जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम। कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या हरीवंशराय बच्चन यांच्या काव्य पंगतीची आठवण दानवे यांनी आपल्या दौऱ्यात शिवसैनिकांना करुन दिली.

Ambadas Danve News
Mahayuti Politics : महायुतीत गृह खात्यावरून धुसफूस सुरू असतानाच भाजपमुळे शिंदेंच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या

या काव्यपंक्ती प्रेरणा मानून आगामी काळात कामाला लागा, असे आवाहन दानवे यांनी केले. सिल्लोड मतदार संघात उमेदवार सुरेश बनकर यांच्यासाठी विजयी वातावरण होते. मात्र, अशी परिस्थिती असताना आपला येथे पराभव झाला असुन आगामी काळात याचा वचपा काढायचा असल्याचे दानवे म्हणाले. तर वैजापूर विधानसभा मतदार संघात धनशक्तीच्या जोरावर विरोधी उमेदवाराने विजय मिळवल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com