Aditya Thackeray On Tanaji Sawant : राजीनामा देण्याची हिंमत नाही, किमान जबाबदारी झटकू नका...

Maharashtra Political News : कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यासंदर्भात जागृक होते.
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री कुठेच दिसले नाहीत. आरोग्यमंत्र्यांनी तर सांगितले की, ही माझी नाही, तर पूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. (Health Minster News) आरोग्यमंत्री राजीनामा देण्याची हिंमत दाखवणार नाहीत, त्यांना लाजही उरलेली नाही. किमान जबाबदारी इतरांवर ढकलू नका, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.

Aditya Thackeray News
Maharashtra MNS Politics : टोलमुक्तीवर फडणवीसांची टोलवाटोलवी; मनसे म्हणते हे खरंच `भाजपकुमार थापाडे` ...

आदित्य ठाकरे यांनी घाटी रुग्णालयाला भेट देत आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्यासोबत बैठक घेत येथील अडीअडचणीही जाणून घेतल्या. (Shivsena) त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासह राज्य सरकारवर टीका केली. गेल्या आठवडाभरापासून आरोग्यविषयक अनेक घटना घडल्या, नांदेडची घटना दुर्दैवी आहे.

सरकारी रुग्णालयात पुरेशी औषधंच शिल्लक नसल्याची कारणे पुढे येत आहेत. अनेक रुग्णांना बाहेरून महागडी औषधी आणायला सांगितली जात आहेत, हा गंभीर प्रकार आहे. (Marathwada) हे कुठेतरी थांबले पाहिजे, विरोधक म्हणून राजकारण करता येते, आम्हीही आंदोलन, मोर्चे काढू शकलो असतो; पण आम्हाला या विषयाचे राजकारण करायचे नाही.

कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यासंदर्भात जागृक होते. नियमित आढावा घेऊन शासकीय रुग्णालयांच्या डीनच्या ते संपर्कात असायचे, आढावा घ्यायचे. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्रत्येक रुग्णालयात जात होते, पण राज्यातील सरकारी हाॅस्पिटलमध्ये शेकडो रुग्ण दगावल्यानंतरही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीही त्या ठिकाणी जायला तयार नाहीत.

एवढी भयंकर घटना घडूनही त्याची जबाबदारी कोणी घेताना दिसत नाही. मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा आम्ही मोर्चा काढला होता, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी या वेळी करून दिली. आज इथे कोणावर आरोप करण्यासाठी आलो नसून येथील परिस्थिती समजून घेण्यासाठी आलो आहे. नांदेडसारख्या घटना घडल्यानंतर सरकार अधिष्ठातांवर गुन्हा दाखल करते किंवा त्यांच्या बदल्या करते. हे सगळे न करता सत्य परिस्थिती काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

Aditya Thackeray News
Nanded AIMIM Politics : नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या एमआयएमला जिल्ह्यात घरघर ...

कारण डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत असतात. २४ तास इमर्जन्सीसाठी सदैव तयार असतात. कोविडच्या काळात हीच यंत्रणा, हेच डॉक्टर्स, नर्सेसमुळे राज्याचे जगभरात कौतुक झाले होते. मग आता काय बदल झाले ? की अशा दुर्दैवी घटना घडताहेत आणि त्यात सामान्य माणसाचा जीव जातोय, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. औषधी खरेदीसाठी हापकिन सोडून दुसरे प्राधिकरण केले आहे.

हे प्राधिकरण योग्य पद्धतीने जबाबदारी सांभाळत नसल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे डीपीडीसीचा फंड मिळण्यास अडचण होत आहे. खरंतर जुलै ते सप्टेंबरदरम्यान डेंगी, मलेरिया यांसारखे आजार व्हायरल येतात. त्याचवेळी औषधे वाढविण्याची गरज असते. अनेक रुग्णालयांनी मागणी करूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही, असा आरोपही ठाकरेंनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com