Sangola News : मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाने वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार त्यांच्या न्याय हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल, तर आपण लढा देऊ; परंतु स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सोबत असेल, असे शेकापच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली. (Dr. Babasaheb Deshmukh meet Manoj Jarange Patil of Jalna)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. मनोज जरांगे यांच्याशी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी चर्चा करून तेथे उपस्थित कार्यकर्त्यांस मार्गदर्शनही केले
डॉ. देशमुख म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी लाठीहल्ल्याची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. त्यासाठी कितीही मोठा लढा द्यावा लागला, तर समाजबांधव तो देईल. मात्र, सरकारनेही या विषयाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे.
माझी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहत नसेल तर आपण लढा देऊ; परंतु स्वतःच्या जीविताची काळजी मराठा बांधवांनी घ्यावी. कोणतेही टोकाचे पाऊल समाज बांधवांनी उचलू नये. आपणास न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप आपल्यासोबत कायम असेल, असे सांगायलाही डॉ. बाबासाहेब देशमुख विसरले नाहीत.
या वेळी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अरुण पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गिरीशभाई गंगथडे, रमेश पवार, विकास इंगोले, गणेश शिनगारे, अण्णासाहेब पवार, वैभव केदार, अरविंद केदार, पिंटू पाटील, किरण पवार इत्यादी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.