DR. Jyoti Mete: लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या ज्योती मेटे आता विधानसभा लढणार

DR. Jyoti Mete Contesting Maharashtra Assembly Elections: शिवस्मारकाचे त्यांचे स्वप्न अद्यापही अधुरे आहे. त्यामुळे त्यांचा इच्छा अन् स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे," असे डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले.
Jyoti Mete
Jyoti MeteSarkarnama
Published on
Updated on

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete)या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. त्यासाठी त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. पण त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या नाहीत, आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

"दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचे मराठा आरक्षणाचे स्वप्न काहीसं पूर्णत्वास जात आहे, मात्र शिवस्मारकाचे त्यांचे स्वप्न अद्यापही अधुरे आहे. त्यामुळे त्यांचा इच्छा अन् स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे," असे विनायक मेटे यांच्या पत्नी आणि शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले.

Jyoti Mete
Manoj Jarange: भुजबळच हे सर्व घडवत आहेत; जरांगेंचा आरोप; धनगर, ओबीसी विरोधक नाहीत...

मेटे साहेबांच्या जाण्याने कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात आज प्रत्येक मावळा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांच्यापेक्षा जास्त संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे. गेल्या 2 वर्षाचा काळ अतिशय कसोटीचा गेला. मराठा आरक्षण आणि शिवस्मारका साठी त्यांनी काम केलं. शिवस्मारकाची वीट देशाच्या पंतप्रधानांनी रोवली आहे, मात्र अद्याप स्मारक झालं नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत ज्योती मेटे यांनी व्यक्त केली.

"मेटे यांच्या पश्चात मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरत आहेत. मेटे उरलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व एक होऊया," अशी भावनिक साद ज्योती मेटे यांनी घातली. विनायक मेटे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com