Shivsena : ना दानवेंच्या आरोपाला प्रत्युत्तर, ना विधान परिषदेत विजयाचा दावा ; सत्तारांचे मौन ?

कदाचित उद्या, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आले आणि भाजपचा पाचवा उमेदवार पराभूत झाला, तर सत्तार पुन्हा जोशात बोलतील. (State Minister Abdul Sattar)
Mla Santosh Danve-Minister Abdul Sattar
Mla Santosh Danve-Minister Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला अन् विजयाचे दावे करणारे शिवसेनेचे नेते गप्प झाले. उद्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. (Shivsena) शिवसेनेसह महाविकास आघाडी आणि भाजपचे आमदार मुंबईतील अलिशान हाॅटेलात दोन दिवसांपासून मुक्काम ठोकून आहेत. आता देखील महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने पाचवा उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली आहे.

दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी विजयाचे दावे केले असले तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मात्र सध्या मौन बाळगले आहे. (Aurangabad) शिवसेनेच्या स्थानिकपासून राज्य व देश पातळीवरील घटना घडामोडीवर भाष्य करणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील सध्या असेच मौन बाळगल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यसभा नवडणुकीच्या वेळी भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांचे मत आपण फोडणार आहोत, ते महाविकास आघाडीला मतं देणार असा दावा सत्तार यांनी जाहीररित्या केला होता. पण प्रत्यक्ष राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागला तेव्हा उलटेच घडले होते. भाजपने अपक्षांसह आघाडीचे आमदार फोडत तिसरा उमेदवारही निवडून आणला.

सत्तार यांनी दानवे यांचे मत फोडणारच असा दावा केल्यानंतर संतोष दानवे यांनी सत्तार यांना वेडाचे झटके येतात, त्यांना हाॅस्पीटलमध्ये दाखल करून उपचारांची गरज असल्याचा पलटवार केला होता. तर भाजपचे धनंजय महाडीक विजयी झाल्यानंतर तर संतोष दानवे यांनी सत्तार यांनीच भाजपला मदत केली. अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची मत आम्हाला मिळवून दिली, असा आरोप करत टोला लगावला होता.

Mla Santosh Danve-Minister Abdul Sattar
अर्जुन खोतकर-गोरंट्याल वाद भडकला : २०२४ चा सामना आतापासूनच रंगलाय

एवढेच नाही तर उद्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत देखील ते भाजपलाच मदत करणार असल्याचा दावा देखील केला होता. आता उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तरी सत्तार यांच्याकडून ना संतोष दानवे यांच्या आरोपावर प्रत्युत्तर आले आहे, ना महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला आहे. सत्तार यांच्या मौनामागे नेमके काय कारण आहे? याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपल्या विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे सत्तार दानवे यांच्या आरोपावर गप्प का? असा सवाल देखील उपस्थितीत केला जात आहे. कदाचित उद्या, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून आले आणि भाजपचा पाचवा उमेदवार पराभूत झाला, तर सत्तार पुन्हा जोशात बोलतील, अशी आशा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com