Dr.Bhagwat Karad : युपीनंतर महाराष्ट्रातही भाजपचे कार्यकर्ते सत्ता पालट करतील..

राज्याला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचे असेल तर सत्ता पालट होणे गरजेचे आहे आणि ती लवकरच होईल, असा दावा देखील कराड यांनी केला. (Dr.Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad-Uddhav Thackeray
Dr.Bhagwat Karad-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : चार राज्यातील भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेनी टाकलेल्या विश्‍वासाचा आहे. याच धरतीवर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) भाजपचे कार्यकर्ते सत्ता पालट करतील, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी व्यक्त केला. (Aurangabad)

चार राज्यातील पक्षाच्या घवघवीत यशानंतर कराड प्रसार माध्यमांशी बोलत होते. कराड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ते आल्यापासून देशाचा विकास झाला आहे. सर्वसामन्याचा विचार करुन वेगवेगळ्या योजना राबवत आहेत, यातून सर्वसमान्यांना सक्षम करण्याचे काम झाले. त्यांचीच प्रचीती आजच्या निकालावरून आली आहे.

अनेक राज्यात भाजपने बहुमत मिळवले आहे. महाराष्ट्रातही सत्ता पालट होणे गरजेचे आहे. राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे बघून शिवसेनेला मते दिली होती. जनतेचा विश्‍वास घात करत तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. यामुळे आता सत्ता पालट होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे जनतेचे नुकसान होत आहे, विकास कामे ठप्प झाली आहेत.

राज्याला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचे असेल तर सत्ता पालट होणे गरजेचे आहे आणि ती लवकरच होईल, असा दावा देखील कराड यांनी केला. पहिल्यांदाच गोव्यात माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतूत्वाखाली भाजपच्या २० जागा आल्या. अपक्ष आणि मगोपने देखील भाजपला पाठिंबा दिल्यामुळे आता गोव्यात भाजपची स्पष्ट बहुमताची सत्ता आली आहे.

Dr.Bhagwat Karad-Uddhav Thackeray
Raosaheb Danve : आमच्या विरोधात कितीही एकत्र या, पण विजय आमचाच..

गोव्याचे निवडणुक प्रभारी म्हणून फडणवीस यांनी काम पाहिले. त्यांनी योग्य नियोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील झालेला विकास योग्यरित्या जनसामान्यापर्यंत पोहचवला. त्यामुळे भाजपची राज्यात ताकद वाढली,पक्षाने जोरदार मुसंडी मारली असेही कराड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com