Raosaheb Danve : आमच्या विरोधात कितीही एकत्र या, पण विजय आमचाच..

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात जो विकास साधला जात आहे, त्यावर जनतेचा विश्वास आहे, हे या चार राज्यातील निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

जालना : पाच राज्यापैकी चार ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे, भाजपच्या विरोधात सगळे विरोधक एकत्र आले होते, पण मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यांच्या विकासाच्या दृष्टीला मत दिले. (Bjp) त्यामुळे आमच्या विरोधात कितीही एकत्र आलात, तरी विजय आमचाच होणार, असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी व्यक्त केला.

देशातील पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. पंजाब वगळता चारही राज्यामध्ये भाजपची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Marathwada) उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, गोवा राज्यात भाजपने सत्तेचे समीकरण जुळवले आहे. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील भोकरदन या आपल्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यासह जल्लोष साजरा केला.

दानवे यांनी स्वतः फटाक्यांची लड लावून आनंद साजरा केला, यावेळी दानवे यांनी पंतप्रधान मोदी जिंदाबाद, भाजप जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या. चार राज्यातील या विजयावर प्रतिक्रिया देतांना दानवे म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी सगळे पक्ष एकत्रित आले होते. लखीमपूरच्या घटनेसह शेतकरी आंदोलन असे प्रश्न उपस्थित केले गेले.

कायदा व सुव्यवस्था व देशातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या लखीमपूरच्या घटनेवरून भाजपवर टीका केली गेली, तिथे देखील भाजपला विजय मिळाला. एकंदरित उत्तर प्रदेश व अन्य तीन राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त केला.

Raosaheb Danve
Bjp : जिल्हा परिषदेला एक सदस्य निवडून येण्याइतकी मतंही तुम्हाला युपीत मिळाली नाही..

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात जो विकास साधला जात आहे, त्यावर जनतेचा विश्वास आहे, हे या चार राज्यातील निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची ही नांदीच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये विरोधक कितीही एकत्र आले तरी आम्हीच जिंकू, असा दावा देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com