Dr.Bhagwat Karad : डाॅ. कराडांना राम पावणार का? घरोघरी जाऊन दिले सोहळ्याचे निमंत्रण, अक्षतांचे वाटप...

Political News : भाजपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण, अक्षतावाटपाची मोहीम हाती घेतली आहे.
Bhagwat Karad
Bhagwat Karad Sarkarnama
Published on
Updated on

Chhtrpati Sambhajingar News: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे 22 जानेवारी रोजी आगमन होत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत आणि देशभरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरात झालेला दर्शन आणि रामकुंड जलपूजनाचा कार्यक्रम हा त्याचाच भाग होता. इकडे छत्रपती संभाजीनगरातही भाजपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण आणि अक्षतावाटपाची मोहीम हाती घेतली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांच्यासह राज्यातील गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Atul Sawe) हेही घरोघरी जाऊन निमंत्रणपत्रिका आणि अक्षतांचे वाटप करताना दिसत आहेत. भागवत कराड यांनी विकसित भारत संकल्पयात्रेतून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघही पिंजून काढला आहे. कराड हे या मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक असून गेल्या दीड वर्षापासून त्यांची तयारी सुरू आहे. आता कराड यांना उमेदवारीच्या रुपाने राम पावणार का? हे पाहावे लागेल.

Bhagwat Karad
Shivsena News : टोलमाफीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन...

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील जागावाटपासंदर्भात महायुतीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. मराठवाड्यात भाजपने चार जागांवर दावा सांगितला आहे, त्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. ही जागा कराड यांच्यासाठी घेण्याची तयारी भाजपने चालवली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने या जागेवर दावा सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य उमेदवारांना कामाला लागा, असे आदेशही दिल्याचे समजते.

यात रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु भुमरे ज्या पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात तो मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे त्यांचा छत्रपती संभाजीगनर लोकसभा मतदासंघाशी संबंध येत नाही, असा दावा भाजपकडून केला जात आहे. भुमरेंच्या नावाला विरोध झाला तर शिवसेना संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये ताणाताणीची शक्यता...

दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेशी युती असताना भाजपला आतापर्यंत हा मतदारसंघ लढवता आलेला नाही. आता आलेली संधी सोडायची नाही, असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून वरिष्ठांकडे धरला जात आहे. शिवाय कराड केंद्रात मंत्री असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास ते विजयी होतील, असा दावाही स्थानिक नेत्यांकडून केला जातो. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये ताणाताणीची शक्यताही वर्तवली जात आहे.

कराड यांची तयारी सुरू

या पार्श्वभूमीवर कराड यांनी मात्र आपणच उमेदवार असे समजून मतदारसंघात दौरे, बैठका, मेळावे आणि कार्यक्रम वाढवले आहेत. राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने प्रत्येकाच्या घरी जाण्याची संधीही कराड यांना मिळाली असून ते याचा पुरेपूर फायदा आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी करताना दिसत आहेत.

(Edited By sachin waghmare)

R...

Bhagwat Karad
Dr. Bhagwat Karad Promised: आदर्श पतसंस्थेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com