Shivsena News : टोलमाफीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन...

Satara सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांना आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर टोल भरावा लागत आहे. हा वाहनधारकांवर अन्याय आहे.
Udhav Thackeray, Sachin Mohite
Udhav Thackeray, Sachin Mohitesarkarnama
Published on
Updated on

Satara Shivsena News : आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी येत्या सोमवारी (ता. 15) आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत टोलमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

यासंदर्भात उद्धव ठाकरे Udhav Thackeray गट शिवसेनेचे Shivsena जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज पत्रकारपरिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील वाहनांना त्यांच्या परिसरातील टोलनाक्यावर टोलमाफी दिली आहे. पण सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांना आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर टोल भरावा लागत आहे. हा सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांवर अन्याय आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना दोन्ही टोलनाक्यांवर टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी येत्या १५ जानेवारीला उद्धव ठाकरे गट शिवसेना आनेवाडी टोलनाक्यावर तीव्र आंदोलन करून धरणे आंदोलन करणार आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. सध्याचे सरकार हे टोलच्या माध्यमातून लोकांची लूटमार करीत आहे.

जिल्ह्यातील दोन टोलनाक्यांवर सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर सेवा रस्ते नाहीत. कारण नसतानाही अनावश्यक बोगदे काढले आहेत. टोलनाक्याच्या परिसरातील पाच ते १५ किलाेमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारला जाऊ नये, असा नियम आहे. पण हा नियम सातारा जिल्ह्यासाठी का पाळला जात नाही?

Udhav Thackeray, Sachin Mohite
Shivsena News : बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक; शिवसैनिकांनी मुंडन करुन केला निकालाचा निषेध

सहापदरी महामार्ग होऊनही अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होते. सातारा जिल्ह्यात दोन टोलनाक्यांवर स्थानिकांना पूर्ण टोलमाफी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, निवेदन देऊनही त्यांनी कोणतीही बैठक लावली नाही. त्यामुळे या टोलमाफी आंदोलनात सातारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सचिन मोहिते यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udhav Thackeray, Sachin Mohite
Satara News : गिरणी कामगाराने मानले शिवेंद्रसिंहराजेंचे आभार; एका दिवसात मिळाला घराचा ताबा...

यावेळी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, जिल्हा संघटिका सुनंदा महामुलकर, प्रशांत पवार, शिवराज टोणपे, सागर रायते, प्रशांत शेळके, सागर धोत्रे, इम्रान बागवान, हरिदास पवार, किशोर घोरपडे, आकाश पवार, सुरेश कांबळे, नीलेश चव्हाण, सागर कदम आदी उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

R...

Udhav Thackeray, Sachin Mohite
राष्ट्रवादीचा निकाल काय लागणार?; आदित्य ठाकरेंनी सांगितलं|Aditya Thackeray|NCP MLA Disqualification

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com