Dr.Bhagwat Karad On Exit Poll : डॉ. भागवत कराडांनी एका झटक्यात एक्झिट पोलची 'सर्जरी' करुन टाकली !

lok sabha election 2024 : गेल्या दोन अडीच वर्षात राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्याचा काही प्रमाणात फटका बसला. तरी आम्ही राज्यात चाळीस जागा जिंकू, असा दावा डॉ. भागवत कराड यांनी केला आहे..
Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat KaradSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला आहे. अशातच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी देशपातळीवर एक्झिट पोलने वर्तवलेला भाजपच्या तीनशे प्लस जागांचा अंदाज मान्य केला. पण राज्यात महायुतीला दर्शविलेल्या जागा त्यांना मान्य नाहीत. राज्यात आम्ही चाळीसहून अधिक जागा जिंकू, असा दावा त्यांनी सरकारनामा प्रतिनिधीशी बोलतांना केला.

देशात भाजपला 330 ते 335 जागांचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त केला जात आहे. तो आम्हाला मान्य आहे, याहीपुढे आम्ही म्हणजे साडेतीनशेच्या वर जाऊ, असेही कराड म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलची सगळ्यांनाच उत्सूकता असते. प्रत्यक्ष मतमोजणीआधीचा हा अंदाज राजकीय पक्षांना परिस्थितीची जाणीव करून देण्यास मार्गदर्शक ठरत असतो. अनेकदा हे अंदाज तंतोतंत खरे ठरतात? तर कधी ते चुकतात, तरी त्याबद्दलची उत्सुकता कायम असते.

शनिवारी एक्झिट पोलचे आकडे बाहेर आल्यानंतर देशपातळीवर पुन्हा भाजपचे सरकार आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे दर्शवणारे होते. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. दुसरीकडे महाराष्ट्राचा विचार केला तर इथे मात्र महायुतीच्या मिशन-45 ला महाविकास आघाडीने धक्का दिल्याचे दिसते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन-तीन जागांचा फरक एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला आहे.

Dr. Bhagwat Karad
Aurangabad Loksabha Exit Poll : खैरेंच्या विजयाचा अंदाज भुमरे, इम्तियाज यांच्या पचनी पडेना; पोल नाकारत म्हणाले...

महाविकास आघाडीसाठी हे पोल दिलासा देणारे तर सत्ताधारी भाजप (BJP) महायुतीला धक्का देणारे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देशपातळीवरील एक्झीट पोलचा अंदाज मान्य केला. पण राज्यातील आकडे मात्र त्यांना मान्य नाहीत. महाराष्ट्रात आमची कामगिरी इतकी खालवणार नाही, असा दावा त्यांनी केला.

Dr. Bhagwat Karad
Manoj Jarange Patil : 'एक्झिट पोल'मध्ये महायुतीला मोठा फटका; जरांगे पाटलांनी 'या' दोन शब्दांतच विषय संपवला

गेल्या दोन अडीच वर्षात राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्याचा काही प्रमाणात फटका बसला. तरी आम्ही राज्यात चाळीस जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला आहे. जनधन खाती, स्वनिधी योजनेच्या माध्यमातून राज्यात केंद्रातील मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. उदिष्ठापेक्षा जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना झाला आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा महाराष्ट्रात आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, असेही कराड म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Dr. Bhagwat Karad
Bacchu Kadu On Exit Poll Result : एक्झिट पोल म्हणजे थोतांड, बच्चू कडू कडाडले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com