Ambadas Danve On narcotics : लातूर, संभाजीनगर, श्रीरामपूरमध्ये अंमली पदार्थांची सर्रास विक्री! बस, कुरिअरमधून होते तस्करी

Ambadas Danve has raised serious concerns over the unchecked sale and smuggling of narcotics in Marathwada. He revealed in the legislature that drugs are being transported openly via buses and courier services : अंमली पदार्थांचा हा गंभीर विषय अगदी तळागाळात पोहचला आहे. 10 ते 12 वर्षाचे मुले- मुली व्यसनाधीन झाली आहेत.
Ambadas Danve On Drugs Issue News
Ambadas Danve On Drugs Issue NewsSarkarnama
Published on
Updated on

Assembly Session News : राज्यातील विविध शहरांमध्ये अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. शाळा-महाविद्यालयीन तरुणांमध्ये यामुळे व्यसनाधिनता वाढत आहे. लातूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर येथील अंमली पदार्थांच्या विक्रीची माहिती देत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या पदार्थांची तस्करी बस आणि कुरिअरच्या माध्यमातून केली जाते, अशी माहिती सभागृहात दिली. मेडिकल स्टोअर आणि फार्मा युनिट असलेल्या ठिकाणांवर वाॅच ठेवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

अंमली पदार्थांचा विषय अतिशय गंभीर झाला असून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला आहे. (Assembly Session) आधी हा विषय फक्त मोठमोठ्या शहरात व्हायचं पण आता हे श्रीरामपूर आणि लातूर सारख्या ठिकाणी सुद्धा होत आहे. लातूर जिल्ह्यातील रोहिना गावांमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला पकडण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचेही समोर आले होते.

श्रीरामपूरात सुद्धा सर्जिकल कॉटनच्या नावाखाली अल्पझोलम पावडरची विक्री करण्यात येत असल्याची घटना समोर आली होती. जवळपास 400 किलो हे पावडर होते. (Ambadas Danve) संभाजीनगरला भंगारच्या नावाखाली दुकानदाराने ड्रॅग्सचा व्यवसाय थाटला होता. अंमली पदार्थांचा हा गंभीर विषय अगदी तळागाळात पोहचला आहे. 10 ते 12 वर्षाचे मुले- मुली व्यसनाधीन झाली आहेत. याला पायबंद घालण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.

Ambadas Danve On Drugs Issue News
Ambadas Danve On ZP School : हिंदी लादू पाहणाऱ्यांच्या काळात मराठी भाषा टाचा घासतेय! शाळांच्या दुरावस्थेकडे अंबादास दानवेंनी लक्ष वेधले ..

देश पातळीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी 'नशा मुक्त भारत' या विषयासाठी परिषद घेतली होती. या परिषदेत महाराष्ट्राचे प्रेझेंटेशन चांगले झाले. अंमली पदार्थ बसगाड्याद्वारे कुरियराच्या माध्यमातून वितरित केले जातात. शहर येण्याच्या अगोदरच चार ते पाच किलोमीटर आधी बस थांबवून हे अंमली पदार्थ उतरवले जातात. तेथून महाविद्यालयापर्यंत ते पोहचवले जातात, अशी माहिती अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली.

Ambadas Danve On Drugs Issue News
Maharashtra Assembly opposition leader history : विधानसभेत कमी आमदार, तरीही विरोधी पक्षनेता!

अंमली पदार्थ रोखण्यामध्ये गृहखाते जितके महत्त्वाचे आहे तितकेच अन्न व औषध, प्रदूषण नियंत्रण खाते महत्वाचे आहे. वैद्यकीय उद्योगांचे युनिट असणाऱ्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. मेडिकल आणि फार्मा युनिट असणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सर्व विभागांचे टास्क फोर्स बनविण्यासाठी आगामी काळात सरकार पावले उचलणार का? असा सवालही दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com