Maharashtra Political News : निवडणूक येताच `करून दाखवलं`, वर्षभर रखडलेले आठ मेडिकल काॅलेज आठवडाभरात सुरू

Eight medical colleges which were stalled for a year started within a week : तिसऱ्या फेरीत केंद्रीय कोट्यातील 15 टक्के (120 जागा) जागांच्या कोष्टकात (सीट मॅट्रीक्स) वाढवण्यात आल्या आहेत.
Maharashtra Politics news
Maharashtra Politics news Sarkarnama
Published on
Updated on

योगेश पायघन

Maharashtra Medical College News : निवडणुका आल्या की सत्ताधारी आणि प्रशासन कसे वेगाने कामाला लागते, याचे उदाहरण म्हणजे राज्यातील आठ नव्या मेडिकल काॅलेजला मिळालेली परवानगी. गेल्यावर्षी राज्यमंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची फाईल वर्षभर धुळखात पडली होती. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी नेते मंडळी अशी काही कामाला लागली की जे वर्षभरात नाही घडले ते अवघ्या आठ दिवसात घडले.

सगळ्या परवानग्या मिळून राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालांमधील प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर झाले. (Eknath Shinde) आता येत्या 9 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व मेडिकल काॅलेजचे उद्घाटन होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असली तरी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर वर्षानुवर्ष रखडलेली कामे कशी चुटकी सरसी पुर्ण होऊ शकतात, हे या निमित्ताने दिसून आले आहे.

नव्याने सुरू झालेल्या राज्यातील 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या तिसऱ्या फेरीत केंद्रीय कोट्यातील 15 टक्के (120 जागा) जागांच्या कोष्टकात (सीट मॅट्रीक्स) वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीत समुपदेशासाठी सहभागी विद्यार्थ्यांना बुलडाणा, अंबरनाथ, हिंगोली, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, जालना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी पसंती नोंदवून तिसऱ्या फेरीत निवड झाल्यास प्रवेशित होता येणार आहे.

Maharashtra Politics news
Eknath Shinde, Devendra Fadnavis : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नवे आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यावर राज्य शासनाने 28 जुन 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले होते. (Mahayuti) या महाविद्यालयांसाठी आवश्‍यक रूग्णालये, महाविद्यालय इमारती, वैद्यकीय शिक्षक, सहाय्यक मनुष्यबळाची जुळवाजुळ करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) पहिल्या फेरीत परवानगी नाकारली. त्यानंतर त्रुटींची पुर्तता करून दुसरे अपिल करण्यात आले.

त्यावर केंद्रीय कुटुब कल्याण महाविद्यालयांना 30 सप्टेंबर रोजी लेटर ऑफ परमिशन (एलओपी) द्यायला सांगितले. तो पर्यंत दुसऱ्या फेरीची प्रक्रीया सुरू झाली होती. वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालय (डिएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण विभाग (एमईडी), महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी प्रवेश प्रक्रीयेत समाविष्ठ होण्यासाठी एनएमसीकडे धाव घेत प्रक्रीया पुर्ण करायला सुरूवात केली.

Maharashtra Politics news
Maharashtra Politics: नेते सावध...आजपासून निवडणूक आयोगाचा "या" आर्थिक व्यवहारांवर वॉच!

एलओपी मिळाले, त्यासंबंधी राज्य शासनाच्या निर्णयाचा शुक्रवारी (ता. 4) आदेश पारीत झाले. आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सलग्नता प्रमाणपत्र मागण्यात आले असून त्यासाठी सोमवारी (ता. 7) संबंधित आठही महाविद्यलयांत पाहणी होईल. त्यानंतर सलग्नता प्रमाणपत्राची प्रक्रीया पुर्ण झाल्यावर राज्य कोट्याच्या 85 टक्के जागा सीट मॅट्रीक्सवर वाढवण्यात येतील. ही प्रक्रीया बुधवार पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी नव्या आठ महाविद्यालयांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.9) दुपारी दीड वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे होणार असल्याचे सांगितले. त्यात राजशिष्ठाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना आमंत्रित करण्याचे आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता व संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com