Eknath Shinde on Ladki Bahin : 'लाडक्या बहिणींनी योजना सुपरहिट केली अन् विरोधकांना...' ; एकनाथ शिंदेंचा टोला!

Eknath Shinde on Uddhav Thackeary News : घरात बसून निवडणुका जिंकता येत नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, लोकांमध्ये जावे लागते, त्यांचे सुख- दुःख जाणून घ्यावे लागते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde at Jalna Rally : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या महाराष्ट्रातील तमाम भगिनींनी सुपरहिट केली विरोधकांना घरी बसवले त्यामुळे ही योजना कधीही बंद होणार नाही. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मी जे बोलतो ते करून दाखवतो असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला.

तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले. त्यामुळे शिवसेना(Shivsena) आणि धनुष्यबाण गहाण पडला. तो वाचविण्यासाठी मी उठाव केला. जनतेने देखील त्यांचा उरलासुरला नक्षा विधानसभा निवडणुकीत बदलून टाकला. कारण घरात बसून निवडणुका जिंकता येत नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, लोकांमध्ये जावे लागते, त्यांचे सुख- दुःख जाणून घ्यावे लागते. असा टोलाही लगावला.

Eknath Shinde
Raosaheb Danve News : 'रावसाहेब दानवे सिर्फ नाम ही काफी है', माजी म्हणून हिणवणाऱ्या चंद्रकांत दानवेंना टोला!

याशिवाय, खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार कोण याच्यावर शिक्कामोर्तब जनतेने केले. त्यामुळे आता ते रडायला लागले आहेत, अशी टीका उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जालना येथे शिवसेनेच्या आभार यात्रेत ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant), मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, खासदार संदीपान भुमरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, संपर्क प्रमुख पंडित भुतेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
Eknath Shinde : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे, लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा दावा

याचबरोबर लाडक्या बहिणीच्या जीवनात बदल घडविण्याचे काम आम्ही केले. परंतू याला देखिल विरोध करण्याचे काम काही लोकांनी केले. या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले. पण कोर्टाने त्यांना हाकलून लावले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. तुम्ही विरोधकांना चांगला हिसका दाखवला आणि ही योजना सुपर हिट झाली. असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

जालन्यातील महायुतीच्या पाचही जागा निवडून आल्या. हे आपण केलेल्या कामाची पोचपावती आहे. येथील जनतेने भरभरून प्रेम केले म्हणून अर्जुन खोतकर चक्रव्यूह भेदून निवडून आले आणि डॉ. हिकमत उढाण यांचे उडाण कुणीही रोखू शकले नाही. मी जे बोलतो ते मी करुन दाखवतो. 2022 मधे आम्ही उठाव केला म्हणुन क्रांती घडली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

या आभार यात्रेत पाच हजार लाडक्या बहिणी भगवे फेटे घालून सहभागी झाल्या होत्या. तसेच हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख ए. जे बोराडे व जालना शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गणेशसेठ राऊत, हरीसेठ देवावाले, विष्णु वाघमारे, योगेश भगत, सचिन दाभाडे, राधाकिसन दाभाडे, विष्णू वाघमारे, प्रीती कोताकोंडा, प्रदीप चौधरी आदींचा सहभाग आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com