Abdul Sattar News : ठाकरे गटातील निष्ठावंत आमदाराच्या मतदारसंघात अब्दुल सत्तार 'अ‍ॅक्टिव'

Eknath Shinde : संभाजीनगर जिल्ह्यातील एक आमदार सोबत न आल्याची सल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात अजूनही कायम आहे.
uddhav thackeray abdul sattar.jpg
uddhav thackeray abdul sattar.jpgsarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले तेव्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आमदार त्यात सहभागी झाले होते. कन्नड-सोयगाव विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत हे एकमेव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले.

"आपल्याला सोबत घेण्यासाठी नोटांनी भरलेल्या सुटकेस घेऊन एक गाडी आली होती, पण आपण गद्दारी केली नाही," असा दावा राजपूत यांनी केला होता.

संभाजीनगर जिल्ह्यातील एक आमदार सोबत न आल्याची सल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या मनात अजूनही कायम आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या शिंदे यांनी तेव्हा कन्नडची जागा यावेळी आपल्याला जिंकायचीच, अशा निर्धार करत कामाला लागा, असे आदेश जिल्ह्यातील नेत्यांना दिले होते.

तेव्हा त्याच व्यासपीठावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नडची जबाबदारी मी घेतो, असे म्हणत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडून खेचून आणण्याचा शब्द दिला होता. आता विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेना शिंदे गटाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी कन्नड-सोयगाव या ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारांच्या मतदारंसघावर लक्ष केंद्रीत केले आहे. नुकतीच अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

निवडणुकीच्या दृष्टीने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत त्यांना पत्रांचे वाटप करत कामाला लावले. यावेळी इतर पक्षातून आलेल्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रवेशही झाले. "एकीकडे माझा प्रासंगिक करार मुख्यमंत्र्यांचा विश्वास कायम, असेपर्यंत आहे. मी हाडाचा शिवसैनिक नाही, असे सांगत स्वतःच पक्षात राहतात की नाही? याची गॅरंटी सत्तार यांना देता येत नाही. तिथे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ खेचून आणण्यासाठी मैदानात उतरले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड-सोयगावमध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्यासह महायुती-महाविकास आघाडी, वंचित, एमआयएम अशा पक्षांच्या उमेदवारांची गर्दी कन्नडमध्ये होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष असणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com