Bjp : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचे श्रेय देखील फडणवीसांनी ठाकरेंना मिळू दिले नाही...

बहुमत चाचणीचे निर्देश दिले होते. असे निर्देश दिलेले असतांना असित्वात असलेल्या सरकारला मंत्रीमंडळाची बैठकच घेता येत नाही. (Devendra Fadanvis)
Devendra fadanvis-Uddhav Thackeray
Devendra fadanvis-Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली. त्यात (Shivsena) औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करुन घेतला. या निर्णयानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी करून दाखवले असे म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचले.

शिवाय केंद्राकडे चेंडू टोलवत या नामांतराला मोदी सरकारने मंजुरी दिली नाही, तर याचे खापर भाजपच्या माथी फोडता येईल, अशी खेळी केली. पण घाईत घेतलेला हा निर्णय चुकल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नामांतर केल्याचा शिवसेनाचा आनंद देखील हिरावून घेतला. राज्यातील सत्ता संघर्षाला आज पुर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदावर शिंदे हे सायंकाळी शपथ घेणार असे स्पष्ट असतांना भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले.

फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतांना पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे ते नव्या सरकारमधील मंत्रीमंडळात सुद्धा असणार नाहीत. या घोषणेने रात्रंदिवस पळापळ करणाऱ्या मिडियासह मोठ्या राजकीय विश्लेषकांना देखील धक्का बसला. याच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारने घेतलेला नामातंराचा ठराव कसा चुकीचा आहे हे सांगितले.

Devendra fadanvis-Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस असणार नव्या सरकारचे ‘शरद पवार’!

सरकार अल्पमतात असल्यामुळे राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले होते. असे निर्देश दिलेले असतांना असित्वात असलेल्या सरकारला मंत्रीमंडळाची बैठकच घेता येत नाही, असा दावा फडणवीसांनी केला. त्यामुळे आता आम्ही नव्याने या नामातंराचा प्रस्ताव मंजुर करून तो केंद्राकडे पाठवू असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आम्ही करून दाखवले म्हणून नामांतराचे श्रेय घेण्याचा शिवसेनेचा डाव देखील फडणवीस यांनी उधळून लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com