Beed News : बीड लोकसभा निवडणुकीवेळी मतदारसंघात बूथ कॅप्चरिंगचा प्रकार घडला असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या करण्यात आलेल्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलला मतदान पार पडले. यावेळी मतदारसंघात बूथ कॅप्चरिंगचा प्रकार घडला असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करण्यात आली होती. (Beed Breaking News)
बीड लोकसभा मतदारसंघात 13 मे मतदान पार पडले. या दिवशी परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आले होता. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने थेट व्हिडीओच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. यामध्ये मतदारांच्या बोटाला केवळ शाई लावली जातेय तर बटण दाबणारा व्यक्ती दुसराच असल्याचे दिसत आहे.
परळीमध्ये बूथ कशा प्रकारे कॅप्चरिंग करण्यात आले हे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची निवडणूक आयोगाने गंभीरपणे दाखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या प्रकरणी बीडमधील मतदानाबाबत तक्रारी समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर याबाबत आवाज उठवला होता. परळीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार यांनी या व्हायरल व्हिडीओची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
रोहित पवार यांच्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही हा मुद्दा उचलून धरत थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. त्यासोबतच या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.