Marathwada Market Committee Election: मराठवाड्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूक रद्द; खर्च भागवण्याची क्षमताच नाही..

Maharashtra : निवडणुक रद्द झालेल्या बाजार समित्यांना दैनंदिन खर्च, व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकेही उत्पन्न नसल्याचे समोर आले आहे.
Market Committee Election News
Market Committee Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Market Committee: कोरोनामुळे रखडलेल्या राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Market Committee Election) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते पॅनल बनवण्यात सगळेच पक्ष गुंतले आहेत.

Market Committee Election News
Raju Shetty Big Announcement : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा ; दोन्ही सरकारला कंटाळलो..

अशातच (Marathwada) मराठवाड्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामागे त्या समित्यांची निवडणूकीचा खर्च झेपण्याची देखील क्षमता नसल्याचे कारण पुढे आले आहे. (Maharashtra) राज्यातील एकूण १७ बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या असून यामध्ये बहुतांश म्हणजे १४ मराठवाड्यातील आहेत.

निवडणूक रद्द झालेल्या बाजार समित्यांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद, हिंगोली-सिरसम, नांदेड- कंधार, बिलोली, किनवट, इस्लामपूर, कुंडलवाडी, लोहा, माहूर, उपरी मुखेड, तर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा आणि मोतळा या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समावेश आहे.

तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील या दोन्ही बाजार समित्यांचे विभाजन झाल्यामुळे या देखील निवडणुकीक अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत. निवडणुक रद्द झालेल्या बाजार समित्यांना दैनंदिन खर्च, व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकेही उत्पन्न नसल्याचे समोर आले आहे.

एकीकडे बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतांना दुसरीकडे वरील समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्याने तेथील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. उर्वरित बाजार समित्यांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com