Paranda Bazar Samiti: महाआघाडीच्या संचालकांचे अपहरण... दोन्ही गट आमनेसामने... परंडा बाजार समिती सभापती निवडणूक रद्द

Paranda APMC Sabhapati Election: पोलिसांनी वेळीच दखल घेऊन बळाचा वापर केल्याने वाद वाढला नाही.
Paranda Bazar Samiti  Sabhapati Election
Paranda Bazar Samiti Sabhapati ElectionSarkarnzama
Published on
Updated on

परंडा (जि. धाराशिव) : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित महाविकास आघाडीच्या फिरायला गेलेल्या संचालकांना माढा तालुक्यातील भीमानगर येथे मारहाण करून पळवून नेल्याचे तीव्र पडसाद परंड्यात उमटले. सभापती, उपसभापती निवडीचा दिवशी ही घटना घडल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते.

बाजार समितीसमोर दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन बळाचा वापर केल्याने वाद वाढला नाही. या सर्व घडामोडींमुळे परांडा बाजार समिती सभापती, उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी (ता. २६ मे) विशेष सभा बोलवून ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Election of Chairman, Deputy Chairman of Paranda Bazar Samiti cancelled)

Paranda Bazar Samiti  Sabhapati Election
Paranda Bazar Samiti : ‘आमच्या बाजूने मतदान करा; नाहीतर जिवंत सोडणार नाही’; महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे हे बाजार समितीच्या आवारात तळ ठोकून होते. परिसरात तणावपूर्ण शांतता होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींच्या निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेला एकही संचालक उपस्थित न राहिल्याने सभा तहकूब करण्यात आली. येत्या शुक्रवारी (ता. २६ मे) पुन्हा सभापती, उपसभापती निवडीसाठी सभा बोलविण्यात आली आहे.

येथील बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीला पाच जागा जिकंता आल्या आहे. सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यासाठी बुधवारी (ता. २४) सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, या सभेसाठी दोन्ही गटाचे संचालक उपस्थित राहिलेले नाहीत.

Paranda Bazar Samiti  Sabhapati Election
Eknath Shinde Meeting at Varsha: लोकसभेसाठी शिंदे-फडणवीसांचा नवा फॉर्म्युला? २२ जागांसंदर्भात राहुल शेवाळेंचं सूचक विधान

महाविकास आघाडी संचालक फिरण्यास गेले असताना त्यांना मारहाण करून पळूवन नेण्यात आले हेाते. आवश्यक गणपूर्ती संख्येइतके सदस्य हजर नसल्यामुळे ११.३० ते १२.०२ वाजेपर्यंत नवनिर्वाचित संचालक मंडळाला उपस्थित राहण्याबाबत वेळ देण्यात आला. त्यानंतरही एकही संचालक हजर राहिला नसल्यामुळे सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली व तहकूब केलेली सभा शुक्रवारी (ता. २६) घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिली.

महाविकास आघाडीच्या संचालकांना मारहाण

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील विश्रामगृहावर महाविकास आघाडीचे संचालक थांबले होते. त्यांना काही गुंडांनी मारहाण केली. त्यांना भेटल्यानंतर खरी परिस्थिती कळणार आहे. आम्ही त्यांना भेटायला चाललो आहोत, असे ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.

Paranda Bazar Samiti  Sabhapati Election
Ashok Uike News : आमदार अशोक उईकेंचा आदिवासी समाजाकडून निषेध; काय आहे कारण ?

परंड्यात बिहारसारखी परिस्थिती

परंडा मतदारसंघात बिहारसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. बाजार समितीचे सभापती, उपसभापती हे महाविकास आघाडीचेच होणार आहेत, असे राष्ट्रवादीचे माजीआमदार राहुल मोटे यांनी स्पष्ट केले.

सावंत म्हणतात, ‘आमचा घटनेशी काहीही संबंध नाही’

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा प्रश्नच नाही. आज घडलेल्या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही, असे धाराशिव जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com