Dhananjay Munde : मंत्री मुंडेंनी पत्नी करुणा यांच्याविषयी काय माहिती लपवली; खंडपीठात याचिका दाखल

Election petition Beed Minister Dhananjay Munde Aurangabad Bench Bombay High Court Election Commission : मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे.
 Minister Dhananjay Munde
Minister Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एकामागून एक, अशा अचडणींचा डोंगर समोर येत आहे. आता त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल झाली आहे.

राजाभाऊ श्रीराम फड यांनी ही याचिका दाखल केली असून, पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार आहे.

राजभाऊ फड यांनी निवडणूक याचिकेची दखल न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी घेतली असून, प्रतिवादीसह मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय होते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

 Minister Dhananjay Munde
Laxman Hake : अंजली दमानिया नव्हे, 'दलालिया' अन् Only 'सनसनाटी'; लक्ष्मण हाकेंचा वेगळा सल्ला

निवडणूक (Election) याचिकेत मंत्री मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रात माहिती दडवण्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्री मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहनं, विमा पाॅलिसी, दागिने, फ्लॅट, तसेच बँकेतील इतर जाॅइंट आणि न्यायालयातील प्रकरणांची माहिती दडवल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

 Minister Dhananjay Munde
Top Ten News : अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले ; आदित्य ठाकरेंकडून शायराना अंदाजात मुंबईच्या स्थितीचे वर्णन! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

राजाभाऊ फड यांनी निवडणुकीपूर्वी देखील याचिका दाखल केली होती. परळी मतदारसंघातील 233 पैकी 122 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून निर्भय वातावरणात आणि लोकशाही मार्गानं निवडणूक घेतल्या जातील, अशी लेखी हमी दिली होती. यावर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. धनंजय मुंडे यांच्या दबावापोटी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिलेल्या लेखी हमी पत्रानुसार कार्यवाही झाली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

परळी विधानसभा निकाल

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना 1 लाख 94 हजार 889 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांना 1 लाख 40 हजार 224 मतांनी पराभव केला. देशमुख यांना 54 हजार 665 मते मिळाली. 2019मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून परळीची जागा जिंकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com