Electronic Voting Machine: ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या; धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात 'महारॅली'

Election Commission and EVM: ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियेमुळे तो मतदानाचा अधिकार निष्प्रभ झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
Electronic Voting Machine
Electronic Voting MachineSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: 'ईव्हीएम'द्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला विरोध सर्वत्र वाढत चालला आहे. ईव्हीएम मशीनवर नागरिक वेगवेगळ्या शंका सुद्धा व्यक्त करीत आहेत. राज्य सरकारने मागील महिन्यामध्ये गावागावात आणि शहरांमध्ये ईव्हीएम मशीनची प्रात्यक्षिके सुद्धा दाखविण्यात आली. परंतु नागरिकांच्या मनातील अजूनही या शंका आहे तशाच आहेत. ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. (Electronic Voting Machine)

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी निवडून सरकार बनविण्यासाठी मतदान हा मूलभूत अधिकार दिला आहे. तसेच जनतेची कामे करण्यात अपयशी ठरणारे प्रतिनिधी बदलण्याचा अधिकारही या मतदानाद्वारेच नागरिकांना मिळालेला आहे. मात्र ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियेमुळे तो मतदानाचा अधिकार निष्प्रभ झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Electronic Voting Machine
Budget 2024 : "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न, पण...", निंबाळकरांची टीका

स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये अनेकदा ईव्हीएम मशीनद्वारे घेतलेल्या मतदानामध्ये तफावती, अनियमितता आणि फेरफार आढळून आलेल्या आहेत. अशा अनेक तक्रारी प्रशासन व सरकारकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून सत्ताधारी पक्ष आपला विजय मिळवतो, असा आरोप ही विरोधकांनी अनेकदा केलेला आहे.

ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणारे मतदान व त्या माध्यमातून निवडून येणारे सरकार यावर जनतेमध्ये प्रखंड प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधी कृती समितीच्यावतीने दि.6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅली काढण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिजाऊ चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आज देशातील जनता, विविध राजकीय पक्ष, संघटना ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यास तीव्र विरोध करीत असून ईव्हीएम (EVM) हद्दपार करण्याची मागणी करीत आहेत. मात्र निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन हद्दपार करीत नाही. विशेष म्हणजे जगातील प्रगत देश देखील मतदान मत पत्रिकेवर घेत आहेत. परंतु सरकार व निवडणूक आयोग ईव्हीएमचा हट्ट धरीत आहे.

लोकशाहीच्या देशात लोकांच्या मताची पायमल्ली होत असून या मशीनच्या माध्यमातून हुकूमशाहीचा उदय होत आहे. त्यामुळे या मशीनला सर्व स्तरातून विरोध होत आहे व झाला पाहिजे, असा उद्देश या समितीचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Electronic Voting Machine
Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांच्या 'ED' चौकशीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, बीडमध्ये शरद पवार गटाचं जोरदार आंदोलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com