Chikhlikar : खासदार असूनही मला कार्यक्रमाला बोलावले जात नाही, पत्रिकेत नाव नसते..

प्रशासन राजशिष्टाचार पाळत नाही असा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. (Nanded)
Mp Pratap Patil Chikhlikar
Mp Pratap Patil ChikhlikarSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील लाखो लोकांनी मतदान करून मला लोकसभेत निवडून पाठवले. पण जिल्हा प्रशासनाकडून राजशिष्टाचार पाळला जात नाही. (Nanded) शासकीय कार्यक्रमांचे मला निमंत्रण दिले जात नाही, पत्रिकेवर माझे नाव छापले जात नाही, विकासकामाच्या कोनशिलेवर खासदार म्हणून माझा उल्लेख नसतो, याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत भाजपचे (Bjp) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी या संदर्भात थेट लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत लोकसभा संसदीय समितीने याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Marathwada) भाजपचे खासदार चिखलीकर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेते यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि चिखलीकर यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्याला नवे नाही.

अधूनमधून हे दोन्ही नेते एकमेकांवर कथी थेट तर कधी अनुल्लेखाने टीका करत असतात. याशिवाय एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी देखील हे नेते सोडत नाहीत. कोरोनामध्ये खासदार जिल्हा प्रशासनाला कामच करु देत नाहीत, सारख्या बैठका बोलावतात असा आरोप अशोक चव्हाण यानी चिखलीकरांवर केला होता. तर नांदेड शहरातील बिल्डर बियाणी यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर चिखलीकर यांनी कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

हे सगळे सुरू असतांना आता चिखलीकरांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्याचा खासदार आणि शिष्टचाराचा भाग म्हणून शासकीय कार्यक्रमांचे निमंत्रण, निमंत्रण पत्रिकेत नाव आणि विकास कामांच्या कोनशिलेवर आपले नाव असयाला हवे.

Mp Pratap Patil Chikhlikar
विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे दिल्ली हायकमांकडे...

परंतु प्रशासनाकडून आपल्याला कार्यक्रमांचे निमंत्रण पाठवले जात नाही, कार्यक्रमांच्या पत्रिकेत खासदार म्हणून आपले नाव नसते, एवढेच नाहीतर विकासकामाच्या उद्धाटन किंवा शुभारंभाच्या कोनशिलेवर देखील आपले नाव हेतूपुरस्पर डावलले जाते असा आरोप खासदार चिखलीकर यांनी केला आहे.

प्रशासन राजशिष्टाचार पाळत नाही असा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. या संदर्भाच चिखलीकर यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचे पालन न होणे म्हणजे आम्हाला निवडून दिेलेल्या मतदारांचा अपमान असल्याचे चिखलीकर यांनी पत्रात नमूद केले आहे. लोकसभा अध्यक्षांनी देखील या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com