विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे दिल्ली हायकमांकडे...

Vidhan Parishad Election 2022| BJP| विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
Vidhan Parishad Election 2022| BJP|
Vidhan Parishad Election 2022| BJP|
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यसभेप्रमाणेच (Rajya Sabha) आगामी विधान परिषदेच्या (Legislative Council Election) निवडणुकीचीही तयारी सुरु केली आहे. येत्या १० जून २०२२ रोजी राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर दहा दिवसातचं म्हणजे २० जून २०२२ रोजी १० आमदार निवडून देण्यासाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

भाजप राज्यसभेसोबतचे विधान परिषदेची निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाकीनऊ आणण्याच्या तयारी आहेत. विशेष म्हणजे त्यादृष्टीने भाजपने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे.

Vidhan Parishad Election 2022| BJP|
महाविकास आघाडीला पहिला झटका; हितेंद्र ठाकूरांची तीन मते भाजपकडे जाणार...

तर उर्वरित तीन जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, कृपाशंकर सिंह यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु आहे. पाचव्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. या नावांची यादी महाराष्ट्र भाजपच्या वतीने दिल्लीत पाठवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसात विधानपरिषदेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला, तर मात्र भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचे सांगितले जात असताना आता भाजपकडून पाचव्या उमेदवाराचीही चर्ची सुरु झाली आहे. विधान परिषदेवर निवडणून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असते. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहे.

दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार देणार आहे. काँग्रेसचाही दोन उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडे चार उमेदवार निवडून येतील एवढी मते असताना त्यांचा पाचवा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न चालेला आहे, अशी माहिती मिळत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com