४०० जणांकडून बलात्कार; एका पोलिसासह माजी नायब तहसिलदाराला बेड्या

अटकेच्या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात खळबळ
Rape Case
Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

बीड : अंबाजोगाई (Ambajogai) अल्पवयीन बलात्कार प्रकरणी (Rape Case) एका पोलिस कर्मचाऱ्यासह, होमगार्ड आणि सेवानिवृत्त नायब तहसिलदाराला बेड्या घालण्यात आल्या आहेत. या अटकेच्या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अंबाजोगाईत मागच्या ६ महिन्यांपासून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात ८ नोव्हेंबरला अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मात्र त्यानंतर यात अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या. १७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी २ महिला दलाल, एका मुख्याध्यापकासह इतर ७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग आढळून आला होता. मात्र त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

Rape Case
समीर वानखेडे अडचणीत! उच्च न्यायालयाचं तपासावरच प्रश्नचिन्ह

यानंतर संतप्त होत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढून आरोपीला अटक का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थितीत केला होता. न्यायालयाच्या या ताशेऱ्यांनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये आणखी ८ जणांना अटक केली आहे. यात एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे.

Rape Case
१२ आमदारांचा निकाल आज लागणार? शेलारांनी गाठली दिल्ली...

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे. मात्र, याप्रकरणात ४०० पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केल्याचे पिडीतेने जबाबात म्हटल्याने, तपासाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com