Fadanvis : राजू, शिरसाटांना टेन्शन देवू नकोस ; फडणवीसांची गुगली ? की सूचक इशारा..

Sanjay Shirsat : साहेब, याचा मला खूप त्रास आहे, तेव्हा जोशात असलेले शिंदे ही म्हणाले, तो तर राहणारच.
Dcm Fadanvis News, Aurangabad
Dcm Fadanvis News, AurangabadSarkarnama

Aurangabad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोच्या समारोपासाठी औरंगाबादेत आले होते. उद्घाटनाच्या वेळी हवामान खराब असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विमानतळावरून परत जावे लागले होते. त्यामुळे आज फडणवीसांनी समारोपाला आवर्जून हजेरी लावली. (Aurangabad) शेंद्रा येथील आॅरिक सिटीत या महाएक्स्पोची छोट्या जीपमधून पाहणी करत असतांना एक गमतीशीर प्रसंग घडला.

Dcm Fadanvis News, Aurangabad
Hingoli News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगरांचा ताफा वेशीवरच अडवला..

२०१९ मध्ये पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Marathwada) यांच्या विरोधात भाजप बंडखोर राजू शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेच शिंदे आणि शिरसाट एक्स्पोमध्ये एकाच जीपमध्ये बसले होते. समोरच्या जीपमध्य शिरसाट-शिंदे तर मागच्या जीपमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस, (Devendra Fadanvis) सहकार मंत्री अतुल सावे होते. महाएक्स्पोची पाहणी करून परत प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शिंदे-शिरसाट लगबगीने फडणवीसांच्या दिशेने गेले.

शिरसाट म्हणाले, साहेब मी तुमचे सारथ्य केले, तेव्हा शिंदेही म्हणाले मी देखील तुमचा सारथी आहे. दोघांमध्ये सारथी बनण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहून फडणवीसांना २०१९ मधील पश्चिम मतदारसंघातील निवडणूक आठवली असावी. त्यामुळे त्यांनी दिलखुलास हसत शिंदे-शिरसाटांना दाद दिली. ही संधी साधत शिरसाटांनी फडणवीसांकडे राजू शिंदेची लाडीक तक्रार केली. साहेब, याचा मला खूप त्रास आहे, तेव्हा जोशात असलेले शिंदे ही म्हणाले, तो तर राहणारच.

यावर फडणवीसांनी चौकार ठोकत राजू राहा, पण शिरसाटांना टेन्शन देवू नको, म्हणताच दोघांनी दिलखुलास दाद दिली. या हास्यविनोदाची आणि प्रसंगाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजू शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शिरसाटांविरुद्ध बंडखोरी केली होती. युती असतांना त्यांनी निवडणूक लढवत ४३ हजारांहून अधिक मते मिळवली होती. अर्थात शिरसाट हे मोठ्या मताधिक्याने तेव्हा विजयी झाले होते.

पण शिंदे यांना शिरसाटांच्या विरोधात भाजप आणि संघाने रसद पुरवली होती, असा आरोप स्वतः शिरसाट यांनी तेव्हा केला होता. आता शिंदे गटात असलेले शिरसाट आणि राजू शिंदे यांच्या भाजपची युती आणि राज्यात सत्ता आहे. भविष्यात ही युती कायम राहिल की नाही? हे आताच सांगता येत नसल्याने राजू शिंदे यांनी शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. संधी मिळाली तर पुन्हा २०२४ मध्ये शिरसाटांशी दोन हात करण्याच्या तयारीत असलेल्या राजू शिंदेंना फडणवीसांनी या निमित्ताने कामाला लाग असा, सूचक इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com