Latur Lok Sabha Constituency : लातुरात भाजपच्या हॅट्‌ट्रीकसाठी फडणवीसांचा निलंगेकरांवरच विश्वास, दिली मोठी जबाबदारी...

Sambhaji Patil Nilangekar News : लोकसभा निवडणुकीत लातूरात हॅट्‌ट्रीक साधायची असले तर निलंगेकर यांना ॲक्टीव्ह करणे गरजेचे होते. फडणवीसांनी त्यांच्यावर संयोजकपदाची जबाबदारी सोपवून श्रृंगारे यांच्या विजयाची गॅरंटीच घेतली आहे.
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
Published on
Updated on

Latur, 31 March : सुधाकर श्रृंगारे यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने भाजपनंतर उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपच्या गोटात अजूनही फारसे उत्साहाचे वातावरण नाही. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात शनिवारी (ता. ३० मार्च) अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आणि या निमित्ताने एकत्र आलेल्या लातूर जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्याचे समजते.

लातूर लोकसभा मतदारसंघात (Latur Lok Sabha Constituency) कुठल्याही परिस्थितीत भाजपची हॅट्‌ट्रीक झाली पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित येऊन सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा निवडून आणा, अशी ताकीदच फडणवीसांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar), अभिमन्यू पवार, रमेश कराड व इतरांना दिली. लगोलग लातूर लोकसभा निवडणुकीसाठी संभाजी पाटील निलंगेकर यांची संयोजक म्हणून निवडही केली. त्यांना सहसंयोजक म्हणून अभिमन्यू पवार, रमेश कराड, किरण पाटील यांची साथ मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sambhaji Patil Nilangekar
Mahadev Jankar News : भाजपने राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निंबाळकरांच्या वाटेतील माढ्यातील अडसर दूर केला...

एकूणच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लातूरमध्ये भाजपच्या हॅट्‌ट्रीकसाठी पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरच विश्वास दाखवल्याचे दिसून आले. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत (Loksabha Election) सुधाकर श्रृंगारे यांच्या उमेदवारीपासून त्यांना निवडून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत संभाजी पाटील निलंगेकर अग्रेसर होते. निलंगेकर यांनी त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आणि तब्बल 2 लाख 89 हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडूनही आणले.

यावेळी मात्र संभाजी पाटील निलंगेकर हे उमेदवार ठरवण्यापासूनच्या प्रक्रियेपासून अंतर राखून होते. अगदी लातूर जिल्ह्यात झालेल्या महायुतीच्या संयुक्त मेळाव्यालाही ते उपस्थित न राहिल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होती. लातूर जिल्ह्यात आधी काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा आणि त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डाॅ. अर्चना पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. पण, या प्रवेश प्रक्रियेतही निलंगेकर यांचा फारसा सहभाग नव्हता.

Sambhaji Patil Nilangekar
Mahayuti Seat Allocation : महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलंय; देवेंद्र फडणवीसांची कबुली

मुंबईत भाजप पक्ष कार्यालयातील प्रवेश सोहळ्याला निलंगेकर मात्र आवर्जून हजर होते. एवढेच नाही तर त्यांनी बसवराज पाटील, अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक यांच्यावरही निशाणा साधला. एकूणच लोकसभा निवडणुकीत लातूरात हॅट्‌ट्रीक साधायची असले तर निलंगेकर यांना ॲक्टीव्ह करणे गरजेचे होते.

फडणवीसांनी त्यांच्यावर संयोजकपदाची जबाबदारी सोपवून एक प्रकारे श्रृंगारे यांच्या विजयाची गॅरंटीच घेतली आहे. पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकल्यामुळे संभाजी पाटीलही आता जोमाने कामाला लागतील. या निमित्ताने विरुद्ध दिशेला तोंड असलेले जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळी एकत्र पहायला मिळणार आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Sambhaji Patil Nilangekar
Devendra Fadnavis News : ‘आम्ही ऑपरेशन केले, तर तुम्हाला कळतच नाही’; दानवेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर फडणवीसांची गुगली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com